शिवनगर : माळेगाव साखर कारखान्याच्या चेअरमन पदी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तर व्हाईसचेअरमन पदी संगीताताई कोकरे यांची निवड करण्यात आली. शनिवार (दि.०५) नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या झालेला बैठकीमध्ये सदरची निवड करण्यात आली.
दरम्यान या निवडी वरती विरोधी गटातील संचालक चंद्रराव तावरे यांनी आक्षेप घेतला.तावरे यांनी संभाजीनगर खंडपीठाच्या निर्णयाची प्रत देत अजित पवार हे ब वर्गातून निवडून आल्यामुळे त्यांची चेअरमन पदी निवड बेकायदेशीर असल्याचा आरोप केला तर रंजन तावरे यांनी माळेगाव कारखान्यासाठी अजित पवार यांनी एकदाही ऊस गाळपा साठी घातला नाही असा आरोप केला.
जूनमध्ये झालेल्या माळेगाव सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनलने सत्ता हस्तगत केली होती. त्याचवेळी अजित पवार हे चेअरमनपदी बसणार हे निश्चित होते. पवार यांच्या पॅनलने विरोधी सहकार बचाव शेतकरी सहकारी पॅनलचा दारुण केला फक्त पॅनेल प्रमुख चंद्रराव तावरे हेच फक्त विजयी झाले आहेत.