

शिवनगर: माळेगाव सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक मतमोजणीच्या दुसऱ्या फेरी अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनलचे सर्व उमेदवार आघाडीवर असून कारखाना पूर्णपणे अजित पवारांच्या ताब्यात जाणार आहे हे निश्चित झाले आहे.
सहकार बचाव शेतकरी सहकारी पॅनलचा दारुण पराभव झाला असून पॅनल प्रमुख चंद्रराव तावरे हेच फक्त विजय होण्याच्या मार्गावर आहेत. अजित पवारांच्या पॅनेलने माळेगाव कारखान्यांमध्ये आपली सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवले आहे. (Latest Pune News)
माळेगाव साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक दुसऱ्या फेरीवा अखेर उमेदवारांना मिळालेली मते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनलचे विजयी उमेदवार
गट नंबर एक माळेगाव
१) शिवराज जाधवराव.. 8612
२) राजेंद्र बुरुंगले.. 8116
३) बाळासाहेब तावरे 7946
सहकार बचाव शेतकरी पॅनलचे पराभूत उमेदवार त्यांना मिळालेली मते
१) रंजनकुमार तावरे..7353
२) संग्राम काटे..6701
३) रमेश गोफणे..6302
रंजनकुमार तावरे यांना पराभवाचा धक्का एकूण 593 मतांनी पराभूत