पुणे : काही दिवसांपूर्वी युद्धजन्य परिस्थितीमुळे विस्कळीत झालेली पुणे विमानतळावरील हवाई वाहतूक आता पूर्णपणे सुरळीत झाली आहे. विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. १२) दिवसभरात तब्बल १९६ विमानांची यशस्वी उड्डाणे झाली. यात ९८ विमानांचे आगमन आणि ९८ विमानांचे प्रस्थान झाले. त्यामुळे गेले काही दिवस सुरू असलेले विमान रद्द होण्याचे (फ्लाईट कॅन्सलेशन) संकट पूर्णपणे टळले असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पुणे विमानतळावरील हवाई वाहतूक सुरळीत झाल्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ते येथून प्रवास करू शकणार आहेत. विमानतळ प्रशासनाच्या आणि कर्मचार्यांच्या प्रयत्नांमुळे ही सेवा पुन्हा सुरू झाली. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दिवसभरात पुणे विमानतळावरून एकूण १९६ विमानांची वाहतूक झाली.
आगमनासाठी आणि प्रस्थानासाठी प्रत्येकी ९८ विमानांची नोंद झाली.
युध्दजन्य स्थिती होणारे फ्लाईट कॅन्सलेशन पूर्णपणे थांबले
विमान रद्द होण्याची समस्या आता पूर्णपणे नियंत्रणात आली आहे.
विमानसेवा पूर्ववत झाल्यामुळे प्रवाशांना त्यांच्या नियोजित वेळी प्रवास करणे शक्य झाले.
पुणे विमानतळावरील हवाई वाहतूक पुन्हा सुरळीत झाल्याने आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. प्रवाशांना झालेला त्रास कमी करण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि आता सेवा पूर्णपणे सुरळीत झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, अशी आम्हाला खात्री आहे.संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ