Delhi IGI Airport: राजधानी दिल्लीत 462 विमानांना विलंब; प्रवाशांना मनस्ताप! काय आहे कारण?

Delhi IGI Airport: एकूण 70 टक्के उड्डाणांना बसला फटका
Delhi IGI Airport
Delhi IGI Airportx
Published on
Updated on

Over 400 flights delayed at Delhi’s IGI airport

नवी दिल्ली : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळावर सोमवारी हवामान बिघडल्यामुळे आणि एका धावपट्टीच्या दुरुस्तीमुळे 462 विमानांचे उड्डाण विलंबित झाले. ही उड्डाणे विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या एकूण विमानांच्या सुमारे 70 टक्के आहेत.

यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयींचा सामना करावा लागला. याशिवाय, 50 टक्के आगमन करणाऱ्या विमानांनाही उशीर झाला, अशी माहिती ‘Flightradar24’ या फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइटने दिली.

दिल्ली विमानतळ प्रशासनाने सोमवारी प्रवाशांसाठी तीन सूचना प्रसिद्ध केल्या. त्यामध्ये म्हटले आहे, “विमानतळाच्या परिसरातील वार्‍याच्या दिशेत झालेल्या बदलांमुळे काही विमानसेवा विलंबित होऊ शकतात.”

विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात झालेल्या मोठ्या विलंबामागे पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग, धावपट्टी क्रमांक 10/28 वर सुरु असलेले सुधारणा काम ही दोन प्रमुख कारणे होती.

हवाई वाहतूक नियंत्रकांकडून (ATC) प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत सकाळी 10.30 ते सायंकाळी 6.30 आणि रात्री 10.30० ते दुसऱ्या दिवशी पहाटे 2.30 या वेळेत ट्रॅफिक फ्लो मॅनेजमेंट उपाय अमलात आणण्यात आले, अशी माहितीही देण्यात आली.

Delhi IGI Airport
Pahalgam Attack: पाकिस्तानवर कारवाईचा प्लॅन तयार; पंतप्रधान मोदींचा जागतिक नेत्यांना फोन

पार्श्वभूमी

दिल्ली विमानतळाने 25 एप्रिल रोजी ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करून, 26 एप्रिल ते 4 मे 2025 या कालावधीत पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे उड्डाणे आणि आगमनावर परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली होती.

पूर्वेकडील वाऱ्यांच्या वेळी IGI विमानतळ प्रती तास केवल 32 विमानांचे आगमन स्वीकारू शकतो, तर पश्चिमेकडील वाऱ्यांच्या वेळी हे प्रमाण 46 प्रती तास इतके असते.

धावपट्टी क्रमांक 10/28 वर सुधारणेची कामे करण्यात येत होती जेणेकरून दोन्ही बाजूंनी कमी दृश्यमानतेत उड्डाणे होऊ शकतील. हे काम 15 मेनंतर पूर्वेकडील वारे सुरु होतील, या अंदाजावर आधारित होते. मात्र, हे वारे एप्रिलच्या मध्यातच सुरु झाले, त्यामुळे कामावर परिणाम झाला.

गेल्या आठवड्यात झालेल्या प्रवाशांच्या तक्रारी, सोशल मीडियावरील संताप, आणि जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केलेली सार्वजनिक टीका लक्षात घेऊन, प्रशासनाने धावपट्टीच्या कामाचा कालावधी जूनपर्यंत पुढे ढकलला आणि धावपट्टी पुन्हा सुरू करण्याची तारीख मेमध्येच ठेवली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news