पीकविमा सहभागासाठी अ‍ॅग्रिस्टॅक नोंदणी, ई-पीक पाहणी बंधनकारक File Photo
पुणे

Pune Farmers: पीकविमा सहभागासाठी अ‍ॅग्रिस्टॅक नोंदणी, ई-पीक पाहणी बंधनकारक

31 जुलै ही सहभागाची अंतिम तारीख असून सहभागासाठी आवश्यक अ‍ॅग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक व ई-पीक पाहणी बंधनकारक असल्याने शेतकर्‍यांनी पुर्तता करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्यात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू झाली असून पुणे जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकर्‍यांनी खरीप हंगामातील पिकांसाठी विमा योजनेत सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे. 31 जुलै ही सहभागाची अंतिम तारीख असून सहभागासाठी आवश्यक अ‍ॅग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक व ई-पीक पाहणी बंधनकारक असल्याने शेतकर्‍यांनी पुर्तता करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.(Latest Pune News)

शेतकर्‍यांसाठी प्रमुख पिकांमध्ये प्रति हेक्टरी भाताचा विमा हप्ता दर 610 रुपये, सोयाबीनचा 580 रुपये, मक्याचा 360 रुपये, कांद्याचा 170 रुपये, भुईमूगाचा 112.50 रुपये आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकर्‍यांना विमा संरक्षण देणे, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकर्‍यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, शेतकर्‍यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, कृषी क्षेत्रासाठीच्या पत पुरवठ्यात सातत्य राखणे.

जेणेकरुन उत्पादनातील जोखमींपासून शेतकर्‍यांच्या संरक्षणाबरोबरच अन्न सुरक्षा, पिकांचे विविधीकरण आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मकतेत वाढ हे हेतू साध्य होण्यास योजनेमुळे मदत होत आहे.

शेतकर्‍यांना पीक विमा योजनेतील सहभागासाठी कॉमन सर्विस सेंटर (सीएससी) आपले सरकारच्या मदतीने विमा योजनेत सहभाग घेऊ शकता किंवा ुुु. िाषलू. र्सेीं. ळप या पोर्टलचे सहाय्य घेऊ शकतात. योजनेतील अधिसूचित पिकांसाठी, अधिसूचित क्षेत्रातील शेतकर्‍यांना भाग घेता येणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असेही ते म्हणाले.

खरीप 2024 मध्ये जिल्ह्यात सुमारे तीन लाखांच्या आसपास शेतकर्‍यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता. गतवर्षी जिल्ह्यांची पिकांची उत्पादकता चांगली राहिली. त्यामुळे पीक विम्यातून साडे सहा हजार शेतकर्‍यांना सुमारे चार कोटी विमा रकमेचा लाभ झाल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT