Pune: घोरवडी धरणाचा पाणीसाठा 75 टक्क्यांवर

पुरंदर तालुक्यातील सहा धरणे फुल्ल; पिण्यासह शेतीच्या पाण्याची चिंता मिटली
Ghorwadi dam
घोरवडी धरणPudhari
Published on
Updated on

सासवड : किल्ले पुरंदर परिसरात दमदार पाऊस झाल्याने घोरवडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. घोरवडी धरणाची एकूण साठवण क्षमता 67.50 दशलक्ष घनफूट इतकी असून, सद्य:स्थितीला धरणामध्ये 75 टक्के पाणी असल्याची माहिती गराडे पाटबंधारे शाखा अभियंता अविनाश जगताप यांनी दिली.

घोरवडी धरणातून सासवड शहराला पिण्याच्या पाण्याची योजना तसेच सुपे-घोरवडी, शिवतारे वस्ती, चव्हाण वस्ती, पिंपळे, पोमणनगर, दातेमळा, भिवडी याठिकाणी पाणीपुरवठा योजना सुरू आहे. धरणातून दिवे प्रादेशिक योजना आहे, परंतु पाइप फुटीमुळे ही योजना बंद स्थितीत आहे. सध्या या धरणावर परिसरातील 55 हेक्टर इतके क्षेत्र सिंचित होते. मागील वर्षी जून महिन्यात घोरवडी धरणात मृतसाठा होता. या वर्षी तालुक्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व दमदार वादळी पाऊस पडला. मागील वर्षाच्या तुलनेत किल्ले पुरंदरच्या पायथ्याशी धरण परिसरात चांगला पाऊस झाल्याने या वर्षी धरणात मुबलक पाणी साठा आहे. पुढील दहा महिने आसपासच्या गावांना पाण्याची टंचाई भासणार नाही. सध्या धरणात 75 टक्के पाणी असल्याचे सासवड पाटबंधारे शाखेचे संदेशक एस. एच. कोरपडे यांनी सांगितले.

सासवड शहराला घोरवडी आणि गराडे धरणातून पाणीपुरवठा सुरू आहे. धरणातील पाण्याच्या उपलब्धतेनुसार नियोजन सुरू आहे. सासवड शहराला दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. -

डॉ. कैलास चव्हाण, मुख्याधिकारी, सासवड नगरपरिषद

बुधवारपर्यंत तालुक्यातील पाऊस

बुधवार (दि. 25) पर्यंत तालुक्यातील पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे (मिलिमीटरमध्ये) : सासवड 237, जेजुरी 281, भिवडी 230, परिंचे 183, राजेवाडी 260, वाल्हा 294, कुंभारवळण 195 आणि शिवरी येथे 127 मिलिमीटर पावसाची नोंद झाली, असे पुरंदर तहसीलमधील लिपिक नवनाथ आव्हाळे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news