

निरा : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याने बुधवार (दि. २५)चा वाल्हेतील मुक्काम आटोपून सातारा जिल्ह्याच्या दिशेने प्रस्थान ठेवले. यादरम्यान या मार्गावरील सर्वांत महत्त्वाचा टप्पा म्हणजे माऊलींच्या पादुकांचे निरा स्नान.
पालखी सोहळ्यासह वारकऱ्यांचे रस्त्यावर ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. मजल-दरमजल करीत माऊलींचा पालखी सोहळा दुपारच्या सुमारास निरा येथे पोहोचला. निरेतील प्रसिद्ध दत्त घाटावर यावेळी माऊलींच्या पादुकांना निरा स्नान घालण्यात आले. यावेळी सातारा आणि पुणे जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.