खडकवासला(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पानशेत-वरसगावसह मुठा खोर्यातील दमदार पावसामुळे गेल्या 24 तासांत खडकवासला धरणसाखळीच्या पाणीसाठ्यात अर्धा टीएमसीपेक्षा अधिक वाढ झाली आहे. शनिवारी सायंकाळी पाचपर्यंत प्रकल्पात 7.26 टीएमसी (24.89 टक्के) पाणीसाठा झाला होता. रायगड जिल्ह्यालगतच्या डोंगरीपट्ट्यासह वरसगाव, पानशेत, मुठा खोर्यात शुक्रवारी (दि. 7) सायंकाळपासून दमदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ सुरू आहे.
शनिवारी सकाळी सहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत टेमघर येथे 22 मिलीमीटर, पानशेत येथे 15, वरसगाव येथे 14 व खडकवासला येथे 2 मिलीमीटर पाऊस पडला. शुक्रवारी सायंकाळी पाचपर्यंत चार धरणांच्या प्रकल्प साखळीत 6.60 टीएमसी (22.63 टक्के) पाणी होते. गेल्या 24 तासांत 0.66 टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे.
हेही वाचा