पुणे

पुणे पोर्शे अपघातातील आरोपी पूर्णपणे शुद्धीत होता : पुणे पोलीस आयुक्त

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुणे पोर्शे अपघातातील अल्पवयीन आरोपीला दारूच्या नशेत काही कळतच नव्हतं हे खोटं आहे. आरोपी पूर्णपणे शुद्धीत होता, असा आमचा युक्तीवाद आहे. त्या रात्रीच सर्व सीसीटीव्ही फुटेज आम्हाळा मिळाले आहे. गाडी आरोपी चालवत नव्हता तर चालक चालवत होता, असा बनाव रचण्याचा प्रयत्न केला गेला. परंतू घटनेचा संपूर्ण क्रम आमच्या लक्षात आला आहे. त्यामुळे आरोपीला लवकरात लवकर शिक्षा मिळेल यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

आरोपीला पिझ्झा, बर्गर दिल्याच्या आरोपात तथ्य नसल्याचेही यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. अमितेश कुमार म्हणाले की, आरोपीचे ब्लड रिपोर्ट आतापर्यंत प्राप्त झालेले नाहीत. ब्लड रिपोर्टवर ही केस अवलंबून नाही. कलम ३०४ लावण्यासाठी उशीर का लावला, याची चौकशी सुरू आहे. कलम ३०४ नुसार गुन्हा सिद्ध झाला तर आरोपीला १० वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते. आवश्यक ते पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. गाडीमध्ये ४ लोक होते तर पबमध्ये पार्टीत आणखी ७ ते ८ जण आले होते, हे तपासात दिसून आले आहे. दारूमुळे आरोपीला काही कळतच नव्हत हे खोटं आहे. आरोपी पूर्णपणे शुद्धीत होता, हा आमचा युक्तीवाद आहे. त्या रात्रीच सर्व सीसीटीव्ही आमच्याकडे आहे. कृतीचा काय परिणाम होईल याचं ज्ञान आरोपीला होते. घटनेनंतर आरोपीने गाडी चालक चालवत होता हे भासवण्याचा प्रयत्न केला, असेही त्यांनी सांगितले.

दोन एफआयआर असण यात काही गैर नाही. आम्ही दोन्ही केसवर तापस करत आहे. ही घटना घडल्यानंतर सकाळी ८ च्या सुमारास गुन्हा दाखल झाला. यानंतर घटनाक्रम कळल्यानंतर ३०४ कलम वाढवण्यात आले. आम्ही ही केस काळजीपूर्वक तपासत आहे. आमचा तपास बारकाईने सुरू असून कोर्टात आमची बाजू ताकदीने मांडणार आहे. तपासादरम्यान कुणाचाही दबाव नाही. सर्व बाबतील क्राईम ब्रँचकडून तपास सुरू आहे. आरोपीला लवकर शिक्षा मिळेल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे पोलिसांकडून दिरंगाई झाली किंवा पोलिसांवर दाबाव टाकला जात आहे, असा आरोप उचित नसल्याचेही अमितेश कुमार म्हणाले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT