पुणे

26/11 पेक्षा मोठ्या हल्ल्याचा होता कट; ‘इसिस’चे पुणे मोड्यूल ब्रेक केल्यानंतर धक्कादायक माहिती

अमृता चौगुले

पुणे : 'इसिस'च्या पुणे मोड्यूलमध्ये पकडलेल्या दहशतवाद्यांचा राज्यासह देशात विविध ठिकाणी 26/11 पेक्षा मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा कट होता, अशी धक्कादायक माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेने केलेल्या तपासात समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुणे पोलिसांनी कोथरूड येथे केलेल्या कारवाईमुळे 'इसिस'चे मनसुबे धुळीला मिळाल्याने पुढील साखळी ब—ेक करण्यात तपास यंत्रणांना यश आले आहे. गुरुवारी 'एनआयए'ने पुण्यातून फरार झालेल्या दहशतवाद्याला झारखंड येथून अटक केली.

मोहम्मद आलम हा पुणे मोड्यूलमध्ये अटक करण्यात आलेला आठवा आरोपी आहे. यामध्ये सुरुवातीला कोथरूड पोलिसांनी कोथरूड येथून दुचाकी चोरताना दोघांसह तिघांना अटक केली होती. 'एनआयए'ने राजस्थान येथील गुन्ह्याच्या अनुषंगाने केलेल्या तपासात त्यांनी 'आयईडी' बनविण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य राजस्थान येथील चित्तोरगड येथून जप्त करताना 'इसिस'च्या 'सुफा' या दहशतवादी संघटनेचा कट उधळून लावला होता. त्या गुन्ह्यात इम—ान खान आणि मोहम्मद साकी तसेच मोहम्मद आलम हे तिघे फरार झाले होते.

त्यांना पुण्यात दुचाकी चोरताना अटक करण्यात आली होती. त्यातील आलम हा फरार होता. पुणे पोलिसांकडून 'एटीएस'कडे आणि नंतर तपास 'एनआयए'कडे गेल्यानंतर दोन दहशतवाद्यांकडील तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. 'एनआयए'ने आतापर्यंत केलेल्या तपासात मोहम्मद साकी आणि इम—ान खान हे 'इसिस'ची विचारधारा पसरविण्यासाठी महाराष्ट्रात सक्रिय झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या दोघांच्या अटकेमुळे 'इसिस'ची लिंक उघड झाली आहे.

साकी आणि इम्रान हे मआयईडीफ बनविण्यामध्ये सक्रिय होते. त्याचबरोबर मास्टर माइंड असलेल्या इम—ान खान याच्याच पोल्ट्री फार्मवर इतर दहशतवाद्यांना मआयईडीफ बनविण्याचे प्रशिक्षण दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर इम—ान खानची पोल्ट्री मएनआयएफने मागील महिन्यात जप्त केली होती. बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेण्याबरोबरच राज्यातील विविध जंगलात त्यांनी बॉम्बस्फोटांच्या चाचण्या घेतल्या होत्या. राजस्थान येथून मुंबई आणि नंतर पुण्यात सेटल झाल्यानंतर त्यांनी पुण्यात बॉम्ब म्हणजे मआयईडीफ बनविण्याचे दोन वर्कशॉप घेतल्याचे समोर आले होते.

आतापर्यंत या दहशतवाद्यांना आसरा देणारे, त्यांना आर्थिक रसद पुरविणारे तसेच मइसिसफची हिंसक विचारधारा पसरविणार्‍या दहशतवाद्यांना मएनआयएफने बेड्या ठोकल्या आहेत. पकडण्यात आलेल्या या दहशतवाद्यांचा देशात विविध ठिकाणी 26/11 पेक्षाही मोठे काहीतरी घडविण्याचा कट असल्याचेही आता समोर आले आहे. तत्पूर्वीच, पुणे पोलिसांनी दहशतवाद्यांना अटक केल्यामुळे मोठा कट उधळला गेला.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT