पुणे

47 गावच्या पोलिस पाटील पदांसाठी बुधवारी आरक्षण सोडत

अमृता चौगुले

वडगाव मावळ(पिंपरी) : मावळ तालुक्यातील रिक्त असलेल्या वडगाव मावळ, तळेगाव दाभाडे या शहरांसह 47 गावच्या पोलिस पाटील पदांची नियुक्ती प्रक्रिया सुरू झाली असून, त्या अनुषंगाने बुधवारी (दि. 30) आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी दिली.

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार मावळ तालुक्यातील 47 व व मुळशी तालुक्यातील 49 अशी एकूण 96 रिक्त असलेल्या पोलिस पाटील भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित पदांची आरक्षण सोडत काढण्यासाठी दि. 30 रोजी सकाळी 11.30 वाजता बावधन येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय, पुणे विभागीय महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी याठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या गावांसाठी होणार भरती

यामध्ये नवलाख उंबरे, जांभवडे, मंगरुळ, शिरे, कातवी, बोरिवली, वडेश्वर, घोणशेत, राखसवाडी, कुसगाव खु., कुणे ना.मा., सदापुर, खामशेत, वेल्हवळी, शिलाटणे, बोरज, दुधिवरे, मालेवाडी, आपटी, गेंवडे आपटी, आतवण, आंबेगाव, महागांव, येळसे, कडधे, बेडसे, करुंज, ब्राम्हणवाडी (बऊर), भडवली, पानसोली, कोळेचाफेसर, तुंग, माजगाव, आंबी, सोमाटणे, दारुंब्रे, चांदखेड, डोणे, पाचाणे, कुसगाव पमा, वडगाव मावळ, खडकाळा, कुसगाव बु, वलवण, तुंगार्ली, भुशी, तळेगाव दाभाडे या गावांचा समावेश आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT