पुणे

Pune News : लोकसहभागातून 200 स्वच्छतागृहे; पालकमंत्र्यांचा पुढाकार

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सवासाठी पुण्यात येणार्‍या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लोकसहभागातून 200 स्वच्छतागृहे, गरोदर महिलांना आरामासाठी आणि महिलांना तीन व्हॅनिटी व्हॅन स्वरूपात हिरकणी कक्ष यांची व्यवस्था उभारली आहे. अनंत चतुदर्शीपर्यंत ही व्यवस्था कायम राहणार आहे. शहरात गणेशोत्सवाच्या काळात बाहेर गावांवरून पुण्यात मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यात महिलांची स्वच्छतागृहांअभावी अडचण होत असते.

त्यामुळे ही अडचण दूर करण्यासाठी पालकमंत्री पाटील यांनी पुढाकार घेतला. त्यानुसार त्यांनी लोकसहभागातून 200 स्वच्छतागृहे, गरोदर महिलांना आरामासाठी आणि महिलांना तीन व्हॅनिटी व्हॅनच्या माध्यामातून हिरकणी कक्ष, तसेच पोलीस व महापालिका कर्मचार्‍यांना जेवणाची मोफत व्यवस्था शेवटच्या तीन दिवसांसाठी करण्यात आली आहे.

याबाबत पालकमंत्री पाटील म्हणाले, की पुणे जिल्हा आणि आसपासच्या परिसरातून हजारो भाविक गणेश दर्शन आणि अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी येत असतात. त्यामुळे परगावाहून पुण्यात आलेल्या गणेशभक्तांची स्वच्छतागृहांअभावी अडचण होते. ती दूर करण्यासाठी लोकसहभागातून ही व्यवस्था उभारली आहे. त्यामुळे गणेशभक्तांची गैरसोय टळणार आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT