इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : उजनी धरणाच्या(यशवंत जलाशय) पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून, मागील 5 दिवसांत 12 टीएमसीने वाढ झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील काही दिवसांत उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. सध्या धरणात 45.26 टक्के पाणीसाठा झाला आहे. उजनीत सध्या दौंडहून रविवारी 40 हजार क्युसेकने विसर्ग येत होता तो सोमवारी सायंकाळी कमी होवून 29850 क्युसेक इतका विसर्ग येत आहे.
उजनी धरणात सध्या 87.91 टीएमसी एकूण पाणीसाठा असून, यापैकी 24.25 टीएमसी इतका जिवंत पाणीसाठा आहे. विशेष म्हणजे सोमवारी एकाच दिवसांत पाच टक्क्याने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. दरम्यान दौंडमधून येणार्या कमी-जास्त विसर्गामुळे उजनीच्या पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. मागील आठवड्यात सोलापूरला पिण्यासाठी पाच टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे पाणी कमी झाल्याने इंदापूर तालुक्यासह उजनीकाठचा शेतकरी वर्ग मोठा धास्तावला होता. यंदाच्या वर्षी पाऊस लांबल्याने उजनी धरण भरते की नाही, अशीच चर्चा सर्वत्र होत आहे.
हेही वाचा :