पुणे

Anant Chaturdashi 2023 : पुण्यात 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका तैनात

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : विसर्जन मिरवणुकीमध्ये त्वरित वैद्यकीय सुविधा पुरवता याव्यात, यासाठी 108 क्रमांकाच्या 23 रुग्णवाहिकांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. सात रुग्णवाहिका अ‍ॅडव्हान्स लाइफ सपोर्टच्या असतील. तसेच, 16 बेसिक लाइफ सपोर्ट रुग्णवाहिका असणार आहेत. यंदा शहरात 23 दुचाकी रुग्णवाहिकांची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अनंत चतुर्दशीनिमित्त महाराष्ट्र आपत्कालीन सेवा विभागातर्फे पुणे जिल्ह्यामध्ये 108 क्रमांकाच्या 82 रुग्णवाहिका कार्यरत असणार आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांत 41 रुग्णवाहिकांच्या माध्यमातून वैद्यकीय सुविधा दिली जाणार आहे. विजय टॉकीज चौक, बेलबाग चौक, टिळक चौक या ठिकाणी रुग्णवाहिकांची सुविधा आहे. विसर्जन घाटांच्या परिसरातही वैद्यकीय सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे.

विसर्जन मिरवणुकीला होणारी गर्दी पाहता महाराष्ट्र आपत्कालीन सेवा विभाग आणि बायकर्स ग्रुपतर्फे यंदा शहरात 23 दुचाकी रुग्णवाहिकांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. घटनास्थळी रुग्णवाहिका दाखल होईपर्यंत दुचाकी रुग्णवाहिकांच्या माध्यमातून रुग्णाला प्राथमिक उपचार देण्यात येतील. या दुचाकी रुग्णवाहिकांना शहरातील सर्व मार्गांची माहिती देण्यात आली आहे. मिरवणुकीदरम्यान आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास 108 क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन महाराष्ट्र आपत्कालीन सेवा विभागाने केले आहे.

मॉडर्न विकास मंडळातर्फे लक्ष्मी रस्त्यावरील विजय टॉकीज येथे मोफत तातडीची वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वैद्यकीय सुविधा गुरुवारी सकाळी 11 ते शुक्रवारी सकाळी 8 या कालावधीत उपलब्ध असणार आहे. वैद्यकीय सुविधा देण्यासाठी तातडीच्या सेवा देणारे तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर छोटे रुग्णालय आणि कार्डियाक रुग्णवाहिकांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वैद्यकीय सेवांचा लाभ घेण्यासाठी 9923303454, 9422020450 या क्रमांकावर संपर्क साधावा, अशी माहिती मॉडर्न विकास मंडळाचे संस्थापक डॉ. संदीप बुटाला यांनी दिली.

वैद्यकीय मदत पाहिजे…?

कडक बंदोबस्त…

पोलिस आयुक्त ः 1
पोलिस सहआयुक्त : 1
अपर पोलिस आयुक्त ः 4
पोलिस उपायुक्त ः 10
सहायक पोलिस आयुक्त : 25
पोलिस निरीक्षक ः155
सहायक पोलिस निरीक्षक,उपनिरीक्षक ः 578
पोलिस अंमलदार : 6 हजार 827
होमगार्ड : 950
एसआरपीएफ कंपनी : 2

विसर्जन मार्गावर पोलिसांची असेल 'नजर'

साध्या वेशात गुन्हे शाखा, विशेष शाखेची पथके तैनात
चोर्‍या रोखण्यासाठी खास पथके
महिलांच्या सुरक्षेसाठी महिला पोलिस साध्या वेशात तैनात
मुख्य विसर्जन मार्गावर मार्गदर्शनासाठी एलईडी स्क्रिन
लहान मुले, वृद्धांसाठी ठिकठिकाणी मदत केंद्रे
रुग्णवाहिकेसाठी स्वतंत्र मार्ग

हेही वाचा

SCROLL FOR NEXT