Ganesh Visarjan : ठाण्यात लाडक्‍या गणरायाला निरोप देण्यासाठी भक्‍तगण सज्‍ज

Ganesh Visarjan
Ganesh Visarjan

ठाणे : पुढारी वृत्तसेवा गेले दहा दिवस गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज लाडक्या बाप्पाला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात येणार आहे. Ganesh Visarjan गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी सुरक्षा व्यवस्था अबाधित राखण्यासाठी ठाणे पोलिसांनी जम्बो पोलिस फौजफाटा तैनात केला आहे. विसर्जन काळात कुठेही कायदा सुव्यवस्था बाधित होऊ नये म्हणून ठाणे ग्रामीण, ठाणे शहर आयुक्तालय आणि मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय परिसरात 18 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याच बरोबर गर्दीच्या ठिकाणी पोलिस ड्रोन व दुर्बिणने वॉच ठेवणार आहेत. ठाणे जिल्ह्यात दोन हजार सार्वजनिक मंडळाच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

आपल्या आवडत्या बाप्पाला गुरुवारी भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात येत आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी Ganesh Visarjan कायदा व्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलिसांनी खबरदारीचे सर्व उपाय योजले असून, जिल्ह्यात तब्बल 18 हजारांहून अधिक पोलीस फौजफाटा सुरक्षेसाठी तैनात केला आहे. त्याशिवाय वैद्यकीय पथक, होमगार्ड, स्वयंसेवकही मदतीसाठी सज्ज राहणार आहेत. जिल्ह्यात अनंत चतुर्दशीला सुमारे दोन हजार सार्वजनिक मंडळांच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे. अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजेपर्यंत गणेश मुर्तींचे विसर्जन पूर्ण होण्याचा अंदाज आहे. गुरुवारी सकाळी 10 पासून गणेश मंडळांच्या मिरवणुका निघतील. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.

विसर्जन मिरवणुकीवर Ganesh Visarjan व विसर्जन घाटांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर राहणार आहे. तसेच गर्दीवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा उपयोग केला जाणार आहे. टेहळणी करण्यासाठी मुख्य विसर्जन मार्गावरील मोक्याच्या ठिकाणी मनोरे उभारण्यात आले आहेत. तसेच मुख्य मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी काही इमारतींची छते प्रशासनाने ताब्यात घेतली आहेत. मिरवणुकीचे छायाचित्रण होणार असून, मिरवणुकीत आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची साध्या वेशातील पोलीस पथके असणार आहेत. तसेच दुर्बिणीद्वारे देखील गर्दीतील हालचालींवर नजर ठेवण्यात येणार आहे. तसेच 33 जीप, 36 वायरलेस, 96 वॉकीटॉकी, 2 गॅस गन, आणि 60 बॅरिगेटस आदी अतिरिक्त साहित्य ठाणे पोलिसांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दरम्यान, वाहतूक पोलिसांनी देखील ठिकठिकाणी तपासणी नाके उभारले आहेत. वाहनांची तपासणी करूनच त्यांना शहरात प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

ठाण्यात 754 सार्वजनिक तर 40 हजार खाजगी गणेश मुर्तीचे विसर्जन

अनंत चतुर्थी Ganesh Visarjan निमित्त गुरुवारी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत म्हणजेच ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, आणि उल्हासनगर या शहरांमध्ये 754 सार्वजनिक तर 40 हजार 196 खाजगी गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. मूर्ती विसर्जनासाठी महापालिकेतर्फे ठिकाणी विसर्जन घाट निर्माण करण्यात आले आहेत. विसर्जन काळात कुठलीही अनुचित घटना समोर येऊ नये म्हणून पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. ठाण्यात विसर्जन काळात 7 पोलीस उपायुक्त, 17 सहाय्यक पोलीस आयुक्त, 87 पोलीस निरीक्षक, 395 सहाय्यक/उपपोलीस निरीक्षक, 3 हजार 893 पोलीस अंमलदार, 4 एसआरपीएफ कंपन्या, 1 आरएएफ कंपनी असा पोलीस बंदोबस्त तैनात राहणार आहे. त्या व्यतिरिक्त बॉम्ब शोधक व नाशक पथक, घातपात विरोधी पथक नेमण्यात आली आहेत.

ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीतील विसर्जनाची आकडेवारी

विभाग – सार्वजनिक – घरगुती
* परिमंडळ एक – 98 – 4,392
* परिमंडळ दोन – 124 – 2,920
* परिमंडळ तीन – 173 – 13,065
* परिमंडळ चार – 212 – 12,756
* परिमंडळ पाच – 147 – 7,063
————
एकूण – 754 – 40,196

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news