नालासोपारा : वसई पश्चिमेकडील सनसिटी परिसरातील एका महाविद्यालयीन तरुणीवर तिच्याच मित्राने मद्य पाजून अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी माणिकपूर पोलिसांनी संबधीत तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
वसई पश्चिमेकडील महाविद्यालयात शिकणारी विद्यार्थीनी मैत्रीणीसोबत संबधीत मित्राच्या कारमधून फिरण्यासाठी म्हणून गेली होती. काहीवेळानंतर तरुणाच्या घरी पोहचल्यावर तिघांनी मिळून रम आणून पिण्याचे ठरविले. त्यानंतर पीडितेची मैत्रीण आणि मित्र दुसऱ्या खोलीत गेल्यावर, संबधीत तरुणाने नशेच्या अवस्थेत असलेल्या विद्यार्थिनीचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिला गर्भनिरोधक गोळी घेण्यास भाग पाडल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे.
घटनेनंतर पीडित विद्यार्थिनीने माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास माणिकपूर पोलीस करीत आहेत.