Vasai Drunk Driving accident 
पालघर

Vasai Drunk Driving accident | बेधुंद मद्य नशेतील थार चालकाचा थरार! गाडी थेट घराच्या भिंतीत घुसली, शेतकरी जखमी

Vasai Drunk Driving accident | फोन दुचाकींचेही नुकसान, वसईच्या ग्रामीण भागातील जांभुळपाडात मध्यरात्री अपघात; चालकासह एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

vasai drunk driving accident thar injured

खानिवडे : विरार पूर्वेकडील ग्रामीण भागातील जांभुळपाडा गाव परिसरात भरधाव वेगाने आलेली थार थेट एका शेतकऱ्याच्या घराच्या भिंतीवर आदळली. काळ्या रंगाची थार जीप घरासमोरील पत्र्याच्या शेडला व त्यामध्ये उभ्या असलेल्या दोन दुचाकींना धडक देत गेली. ही जीप घराच्या मुख्य दरवाजाच्या भिंतीवर आदळल्याने भिंत तसेच पूर्वेकडील भिंत व खिडकी खाली पडली. या घटनेत हॉलमध्ये बसलेले सुभाष जयराम सुतार यांच्या अंगावर भिंत जखमी झाले.

घरमालक सुभाष जयराम सुतार (वय ५९) यांच्या डोक्याला व डाव्या हाताला दुखापत झाली. ही घटना ५ ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या थार चालकाने एका ग्रामीण खेड्यातील घराला अशाप्रकारे नुकसान केल्याने गावकऱ्यांनी मोठा संताप व्यक्त केला आहे. चालकासह थारमधील एकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

सुभाष सुतार हे जांभुळपाडा येथील घर क्रमांक ४८/ब येथे पत्नी सुवर्णा व मुलगा आकाश यांच्यासह राहतात. त्यांच्या घरासमोर भालीवली ते भाताणेच्या दिशेने जाणारा सिमेंटचा रस्ता असून, घराच्या मुख्य दरवाजासमोर पत्र्याचे शेड आहे. या शेडखाली त्यांची टीव्हीएस ज्युपिटर (एमएच ४८/सीव्ही ४१५२) आणि हिरो एक्स्ट्रीम (एमएच ४८/डीएल २८८१) या दोन दुचाकी उभ्या होत्या. रात्री ११.३० ते ११.४५च्या दरम्यान महिंद्रा थार (एमएच ४८/डीएक्स ७८९८) ही जीप भाताणेच्या दिशेकडून भालीवलीकडे जात होती.

मध्यधुंद अवस्थेत चालवून ती भरधाव आणि निष्काळजीपणे थेट घरात घुसवली. जीप थेट घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये घुसली. त्यामुळे शेड उद्ध्वस्त होऊन दोन्ही दुचाकींना धडक बसली. त्यानंतर जीप घराच्या मुख्य दरवाजाच्या भिंतीवर आदळल्याने भिंत व खिडकी कोसळली. लाकडी माळा असलेले हे घर सुदैवाने लाकडांसह न कोसळल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.

अपघातानंतर परिसरातील रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. मदत कार्य करत पोलिसांना खबर दिली. एफआयआरमध्ये तक्रारदाराने चालक व त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तीकडून दारूचा वास येत असल्याचा उल्लेख केला आहे. अपघातात दोघांनाही दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. पोलिसांनी चालकाची ओळख अंकीत रविशंकर मिश्रा (वय २६, नालासोपारा पूर्व) अशी, तर त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तीची राज इंद्रजीत यादव (वय २४) अशी नोंद केली आहे.

या अपघातात थारच्या पुढील भागाचे, बॉनेटचे तसेच पुढील व मागील काचेचेही नुकसान झाले असून एअरबॅग बाहेर आल्याचे एफआयआरमध्ये नमूद आहे. एका खेडेगावात अपेक्षित नसलेल्या या अपघातात घराचे नुकसान, दोन दुचाकींचे नुकसान आणि तक्रारदाराला झालेली दुखापत यामुळे या घटनेचे गांभीर्य वाढले आहे.

याप्रकरणी मांडवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेड कॉन्स्टेबल विकास थाकसेन मेहर यांच्याकडे तपास सोपविण्यात आला आहे. पोलिसांकडून अपघाताची पुढील चौकशी सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT