World Turtle Day : डहाणू पारनाका येथे देशातील पहिले कासव संवर्धन केंद्र, कासवांच्या उपचारासाठी ठरतेय वरदान! File Photo
पालघर

World Turtle Day : डहाणू पारनाका येथे देशातील पहिले कासव संवर्धन केंद्र, कासवांच्या उपचारासाठी ठरतेय वरदान!

गोव्यापासून ते गुजरातच्या किनाऱ्यापर्यंतच्या जखमी कासवांना या केंद्रातून जीवदान मिळाले आहे.

पुढारी वृत्तसेवा

The country's first turtle conservation center at Dahanu Parnaka is proving to be a boon for the treatment of turtles

पालघर : निखिल मेस्त्री

सागरी कासवांच्या संवर्धनासाठी पालघर जिल्ह्यातील डहाणू पारनाका येथील कासव उपचार व संवर्धन केंद्र वरदान ठरत आहे. आजवर हजारो कासवांवर या उपचार केंद्रामध्ये उपचार करण्यात आले आहेत. जखमी समुद्री व अन्य कासवांवर उपचार देणारे भारतातील हे पहिलेच कासव उपचार व संवर्धन केंद्र आहे. प्राणी संवर्धन करणाऱ्या संस्थेच्या संकल्पनेतून हे उपचार केंद्र सुरुवातीला उभे झाले.

शासनाने या केंद्राला अधिकृत मान्यता दिली आहे. कासव उपचार व संवर्धनाचे काम गेल्या चौदा वर्षपासून अव्याहतपणे सुरू आहे. त्यामुळे हे उपचार केंद्र कासवंसाठी नंदनवन ठरले आहे. गोव्याच्या किनाऱ्यापसून ते गुजरातच्या किनाऱ्यापर्यंतच्या जखमी कासवांना या केंद्रातून जीवदान मिळाले आहे.

दिवंगत प्राणी मित्र धवल कंसार यांच्या संकल्पनेतून केंद्र

पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील दिवंगत प्राणी मित्र व मानद सदस्य धवल कंसार यांच्या संकल्पनेतून हे केंद्र २०११ मध्ये उदयास आले. ॲनिमल सेव्हिंग ग्रुप या संस्थेने परिसरातील प्राण्याना जीवदान देण्याचे काम केले. त्यावेळी समुद्री जखमी कासवांवर उपचार पद्धती अस्तित्वात नव्हत्या. वाघ या प्राण्याप्रमाणे समुद्री कासव हा अधिसूचित जीव आहे. त्यामुळे जखमी कासव यांच्यावर उपचार व्हावेत यासाठी ग्रुपने प्रयत्न सुरू केले. दरम्यान कासवावर उपचार करणारे व त्यात तज्ञ असणारे पशुवैद्यकीय डॉ. दिनेश व्हीनेरकर यांची माहिती कंसारा यांना मिळाली. त्यांनी जखमी कासवांवर उपचार करायला सुरुवात केली. वन विभागाच्या देखरेखीखाली हे काम होत होते. अखेर अनेक महतप्रयासानंतर वन विभागाच्या कार्यालयाच्या मागे तात्पुरते कासव उपचार व शुश्रूषा केंद्र स्थापन झाले.

सुरुवातीला या केंद्राला सरकारची मान्यत नव्हती किंवा अनुदान मिळत नव्हते. तेव्हा तरपोलिन अर्थात ताडपत्री व कृत्रिम खड्डे खोदून त्यात जखमी कासवांवर उपचार केले जात होते. खड्ड्याच्या मध्यभागी लाकूड बांधून त्यावर सलाईन लावून कासव उपचार सुरू होते. दरम्यान अॅनिमल सेव्हिंग ग्रुपचे कार्य वाढत गेले व २०१३ मध्ये त्याचे रूपांतर वाइल्ड कंझर्वेशन अँड अॅनिमल वेलफेअर असोसिएशन मध्ये झाले.

कासव जखमी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरुवातील त्याला दुकाचीवरून उपचार केंद्रात आणले जायचे. त्यामुळे वन्यजीवाना आवश्यक असलेल्या रुग्णवाहिकेची गरज निर्माण झाली. मुंबईतील फिजा नवणितलाल शहा यांनी सामाजिक उत्तरदायित्‍वतातून ही रुग्णवाहिका देऊ केली. परिवहन विभागाच्या आवश्यक परवानगी नंतर ही रुग्णवाहिका उपलब्ध झाली. जखमी प्राणांसाठी किंवा बचाव कार्य करण्यासाठी अशा पद्धतीची प्राण्यांची विशेष रुग्णवाहिका सेवा २०१४ मध्ये देशातील पहिली सेवा ठरली. या रुग्णवाहिकेचा आजवर ३०० पेक्षा जास्त जखमी कासव, बिबटे, समुद्री पक्षी आणि इतर वन्यजीवांना फायदा झाला आहे. त्यानंतर उपचार केंद्राला राज्य ससरकरच्या वन विभागाने अधिकृत मान्यता दिली व आता हे केंद्र उपचारासाठी सुसज्ज बनले आहे.

डॉक्टर विन्हेरकरांकडून कासवांवर उपचार

सध्या केंद्रात १२ ते १४ एफआरपी टॅंक,क्ष किरण यंत्र, लेजर उपचार यंत्रणा, अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध असून डॉक्टर विन्हेरकर कासवांवर उपचार करीत आहेत, अशी माहिती कासव उपचार केंद्रातील सेवक व वन्यजीव रक्षक रेमांड डिसोझा यांनी दिली आहे. हे उपचार केंद्र अद्यायवत ठेवण्यासाठी वन विभागाचे जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी दिवाकर, वन अधिकारी, कर्मचारी प्रभाव भोई तसेच वाईल्ड लाईफ कंझर्वेशन अँड ॲनिमल वेल्फेअर यांच्या देखरेखीखाली व्यवस्थितरित्या सुरू आहे.

ऑलिव्ह रीडले कासवाला कृत्रिम पंख बसवण्याचा यशस्‍वी प्रयोग केंद्रात

डहाणूतील वन विभागाच्या कासव पुनर्वसन केंद्रात वाइल्डलाइफ कंन्झर्वेशन अँड अॅनिमल वेल्फेयर असोसिएशनद्वारे उपचाऱ् केंद्राचे कामकाज पाहिले जाते. येथे जखमी अवस्थेतील समुद्री कासवांवर पशूवैद्य डॉ. दिनेश विन्हेरकर उपचार करतात. या उपचार केंद्रामध्ये जगाने दखल घ्यावी, असे प्रयोग डॉक्टर विन्हेरकर यांच्याकडून केले गेलेत. जखमी व जायबंदी झालेल्या ऑलिव्ह रीडले कासवांच्या पुढच्या दोन पायांना कृत्रिम पंख अर्थात पाय बसविण्याचा यशस्वी प्रयोग या उपचात केंद्रात केला गेला. जागतिक पातळीवर अवयव प्रत्यारोपण झालेल्या चार घटनांमध्ये हा प्रयोग तिसऱ्या क्रमांकाचा ठरला.

इटली येथे झालेल्या पशू वैद्यकीय आंतरराष्ट्रीय परिषदेत हा प्रयोग डहाणू फ्लिपर म्हणून नावरूपाला आला. इतकेच नव्हे यासाठी डॉक्टर विनहेऱ्कर यांना गौरवण्यात आले. या परिषदेत तज्ञ डॉ. डगलस मेडर यांनी जखमी सागरी कासवांसाठी कृत्रीम अवयव हा प्रबंध सादर केला. त्यामध्ये डहाणू फ्लीपर यांचा उल्लेख मूलभूत संशोधनातील ऐतिहासिक घटना म्हणून करण्यात आली. आंतरराष्ट्रीय पशुवैद्य क्षेत्रात ही उल्लेखनीय बाब देशासाठी अभिमानस्पद ठरली आहे.

गोव्यापासून गुजरातच्या किनाऱ्यापर्यंत कासवांवर उपचार

गोव्यापासून ते गुजरातच्या समुद्रकिनारी जखमी झालेल्या २५० पेक्षा जास्त कसवांवर कासव उपचार केंद्रात आवश्यकतेनुसार विविध उपचार करून त्यांना पुनः समुद्रात सोडण्यात आले आहे. हे काम आजही अव्याहतपणे सुरू आहे. सध्या उपचार केंद्रात १० ते १२ कसवांवर उपचार सुरू आहेत.

बॉलीवूडच्या पुढाकाराने कासव उपचार केंद्राची जनजागृती

सिनेतारका जॅकलीन फर्नांडिस, आलिया भट, पूजा सावंत, स्नेह उलाल अशा अभिनेत्रींनी पुढे येत कासव संवर्धनासाठी उपयुक्त असलेल्या कासव उपचार केंद्राचे महत्व अधोरेखित केले. एका कार्यक्रमांमध्ये जॅकलीन फर्नांडिस हिने सागरी कासवांचा जिव्हाळा व्यक्त करत कासवांच्या संवर्धनाचे आवाहन केले होते. तर आलिया भट हिने उपचार झालेल्या जखमी कासवाला डहाणू येथून समुद्रात सोडले होते. पूजा सावंत व स्नेहा उलाल या अभिनेत्रींनी उपचार केंद्राला भेटी दिल्या. या सिनेतारकांच्या भेटीमुळे व त्यांच्या जनजागृतीमुळे कासव उपचार व सुश्रुषा केंद्राला चांगलीच ओळख मिळाली आहे. त्यामुळे कुठेही कासव जखमी दिसल्यास या केंद्राला पहिला संपर्क केला जातो व त्या माध्यमातून जखमी कासव किंवा वन्यजीव यांना जीवदान मिळते.

कासवांच्या वीणी हंगामात कासव येण्याचे प्रमाण घटले

समुद्रकिनाऱ्यालगत कासवांच्या वीणी हंगामात कासव येण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा खूप कमी झाले आहे. समुद्रकिनारी त्यांना अंडी घालण्यासाठी लागणारे पोषक वातावरण नष्ट झाल्यामुळे हे कासव किनारी भागात फिरकत नसल्याचे तज्ञ सांगत आहेत. समुद्री जैवविविधतेत कासवाला विशेष स्थान आहे. त्यामुळे नैसर्गिक साखळी अबाधित आहे. मात्र किनाऱ्यावर होत असलेली धूप, उच्चतम भरतीची रेषा वाढणे, किनारी प्रदूषण, प्लास्टिक युक्त किनारे अशा कारणांमुळे कासव किनारी भागात येणे टाळत आहेत असेही काही प्राणीप्रेमींचे म्हणणे आहे. कासवांनी अंडी घालण्यासाठी किनाऱ्याला पसंती देण्यासाठी उपाययोजनांची आवश्यकता अधोरेखित होत आहे. समुद्रकिनारी गावांमध्ये ऑलिव्ह रिडले, ग्रीन सी, लॉन्गरहेड, लेदर बॅक आणि हॉक्सबील या जातींची कासवे आढळत असल्याचे स्थानिक कासवमित्र सांगतात.

मानद वन्य जीव रक्षक हार्दिक सोनी
गतवैभव प्राप्त होण्यासाठी शांत किनाऱ्यांची आवश्यकता आहे. परंतु त्यासाठी वाळूची पठारे, त्यावर मर्यादावेल, केतकी, केवडा, दुर्वा तसेच अन्य झाडेझुडपे, वेली इ. वाढली पाहिजे. त्यासाठी अवैध रेतीउपसा, किनाऱ्यांवर भराव, सीआरझेडचे उल्लंघन होऊन उभी राहिलेली बांधकामे, पर्यटनाचा अतिरेक थांबवा यासाठी उपाययोजना अंमलात याव्या असे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT