तलासरी: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत झरी धांगडपाडा येथील स्मशानभूमी मध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांकडून पाचशे रोपट्यांची लागवड करण्यात आले असून सर्व झाडे संगोपन आणि संवर्धनासाठी दत्तक घेतले आहे. यामध्ये जगली आणि फळझाडे यांच्या समावेश आहे.गटविकास अधिकारी डॉ वैभव सापळे यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले.
तलासरी तालुक्यातील झरी धांगडपाला येथील स्मशानभूमीत जिल्हा परिषद शाळा झरी धांगडपाडा शाळेच्या विद्यार्थ्यांकडून 500 विविध झाडांच्या रोपट्यांची लागवड करण्यात आले असून 300 विद्यार्थ्यांनी ही झाडे दत्तक घेतली असून ते मागील महिन्यापासून दर शनिवारी या झाडाला पाणी देणे त्यांची मशागत करणे यासारखी कामे करून त्यांचे पालन पोषण करीत आहेत.
सदर शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या योजनेअंतर्गत ही शाळा जिल्ह्यात प्रथम आलेली आहे. विद्यार्थ्यांनी पाचशे झाडे लावणे हा एक पर्यावरणपूरक उपक्रम असून, यामुळे पर्यावरण संवर्धन, हवेची शुद्धता आणि जैवविविधतेत वाढ होते. xc
सदर शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या योजनेअंतर्गत ही शाळा जिल्ह्यात प्रथम आलेली आहे. विद्यार्थ्यांनी पाचशे झाडे लावणे हा एक पर्यावरणपूरक उपक्रम असून, यामुळे पर्यावरण संवर्धन, हवेची शुद्धता आणि जैवविविधतेत वाढ होते. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 500 रोपे लावली, जेणेकरून विद्यार्थी निसर्गाचे महत्त्व समजून घेतील आणि भविष्यासाठी जबाबदार नागरिक बनतील. जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या या उपक्रमामुळे तालुक्यात विद्यार्थ्यांचे कौतुक केले जात आहे. यावेळ शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.