केळवा रोड ः पालघर जिल्ह्यातील एसटी महामंडळाला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या सफाळे एसटी आगराला सध्या उतरती कळा लागली आहे. सफाळे भागातील तांदुळवाडी गिराळे,मथाणे, नावझे, दांडाखाडी दातिवरे, वेढी, भादवे अशा 60 गावांना एसटी बस सेवा पुरवणारे सफाळे एसटी आगर आज फक्त 24 बसच्या आधारावर हा बस डेपो चालवून प्रवाशांना अनियमित सेवा पुरवत आहे.
या बस डेपो मध्ये बस संख्या कमी असल्याकारणामुळे विळंगी सह अनेक गावातील बस सेवा बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे विद्यार्थी भाजीविक्रेते दूध विक्रेते आणि नोकरदार यांना खाजगी सेवेचा वापर करून अधिक पैसे भरून प्रवास करावा लागतो.
सफाळे एसटी आगारामध्ये 24 बस 84 चालक-वाहक, 16 कार्यालयीन कर्मचारी, व 12 मेकॅनिकल इंजिनियर अशे एकूण 112 कर्मचारी या बस डेपो मध्ये काम करत असून या बस डेपोचे उत्पन्न 2 लाख असून डिसेंबर 2025 या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात या डेपोचे मासिक उत्पन्न 65 लाख इतके होते. या उत्पन्नातून कर्मचारी वेतन आणि डिझेल मेंटेनन्स खर्च 60 लाख रुपयांच्या पेक्षा अधिक असल्या कारणामुळे बस डेपो तोट्यामध्ये आहे .
अनियमित बस सेवेच्या अभावी प्रवाशांनी या बस डेपोकडे पाठ फिरवली आहे. सध्या या बस डेपोची दयनीय अवस्था झाली असून जिल्ह्यामध्ये सर्वाधिक प्रवाशी उत्पन्न देणाऱ्या सफाळे डेपोला आज उतरती कळा लागली आहे.चेतन पाटील, विळंगी ग्रामपंचायत उपसरपंच.
सफाळे एसटी डेपो उत्पन्नापेक्षा जास्त तोट्यामध्ये असल्या कारणामुळे विळंगी तसेच काही गावातील बस सेवा बंद करण्यात आल्या आहेत.सचिन माळसे, सफाळे बस डेपो व्यवस्थापक.