

तलासरी ः यंदाच्या वर्षी पावसाने उच्चांक गाठल्याने शिवाय मुक्काम ही लाबविल्याने यंदाच्या आंबा हंगामास उशीर झाला. मात्र डिसेंबर महिन्यात थंडी वाढल्याने आंबा पिकांसाठी योग्य वातावर निर्माण होऊन झाडाला बहरदार मोहर फुटले आहेत. यामुळे बागायतदार खुशीत होता. परंतु गेल्या काही दिवासांन पासून दाट धुक्यानी या परिसरात कहर केले असून त्याचा परिणाम आंबा, काजू बागायतीवर होईल या चिंतेत बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत.
तलासरी परिसरात दाट धुके सकाळी उशिरापर्यंत राहत असल्याने आंबा व काजू पिकांसासाठी धोकादायक ठरू शकते. असे शेतकरी आणि तज्ज्ञांचे म्हणणे आहे.दाट धुक्यामुळे दवाचे प्रमाण प्रचंड असून बागायती झाडे ओलीचिंब होत आहेत. तसेच सकाळी साडेनऊ ते दहा वाजेपर्यंत दाट धुके आणि नंतर ढगाळ वातावरण राहत असल्यामुळे त्याचा परिणाम आंबा, काजूमोहर आणि इतर फळबागे, यांच्यावर होत असून बुरशीजन्स रोग, किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्याता असल्याचे आंबा बागायतदारांकडून सांगण्यात येत आहे.
तालुका आणि परिसरात आंबा मोहरण्याकरिता पोषक थंडी डिसेंबरच्या शेवटी आणि जानेवारी महिन्यात सुरु झाली. तसेच काही झाडांना वाटण्याच्या आकारातील फळधारणाही झाली आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून दाट धुके आणि नंतर ढगाळ वातावरण राहत असल्यामुळे सदर वातवर कीड आणि बुरशीजन्य रोगास पोषक असल्याचे जाणकार शेतकऱ्याचे म्हणणे असून आंबा मोहर व फळांच्या संरक्षणाकरिता बागायतदारांनी तत्काळ औषधांची फवारणी करावी.तलासरीत 82 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात आंबा पीक बागायती शेतकरी घेतात.
हवामानातील बदलांमुळे दाट धुके आणि ढगाळ वातावरण निर्माण होत असल्यामुळे आंबा उत्पादनात घट होण्याची शक्यता उपलाट गावातील बागायतदार संदीप हरपाले यांनी सांगितले. शेतकरी संकटात सापडला असताना कृषी अधिकारी बागायतीकडे फिरकतही नाही शिवाय कृषी विभागाकडून योग्य मार्गदर्शनही करीत नसल्याचा आरोप शेतकरी बागायतदारांनी केला आहे.
दाट धुके येत असल्यामुळे मोहर काळी पडून फलधारणा होत नाही. तसेच कीड रोगाच्या प्रमाणात वाढ होऊन वाटण्याच्या आकारातील आंबा पिवळा होऊन गळून पडत असल्याने फळ बागायतीचे मोठे नुकसान होत आहे.
संदीप हरपाले, फळबाग शेतकरी.