पालघर : पालघर विधानसभेचे आमदार राजेंद्र गावित यांनी मोठा पाठपुरावा करून सफाळे पाणीपुरवठा योजनेसाठी ९८ कोटी झांजरोळी पाणीपुरवठ्यासाठी ७१ कोटी आणि वाडा पोखरण सध्याची रक्कम ७७ कोटी याबरोबरच अनेक पाणीपुरवठ्याच्या योजना मंजूर केल्या त्याच्या प्रत्यक्षात काम सुद्धा सुरू झाली. तर काही पाणीपुरवठा योजनांची ९० टक्के काम पूर्ण असल्याची स्थिती आहे मात्र या कामांमध्ये दिरंगाई होत असून अनेक ठिकाणी टाकीपर्यंत पाणी न पोहोचणे पाईपलाईनला गळती लागणे, तर काही ठिकाणी पाण्याच्या टाकीचे काम व्यवस्थित न झाल्याने या भागातील नागरिकांच्या तक्रारी होत्या. या संदर्भात आमदार गावीत यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची तसेच जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या उपस्थितीत या सर्व कामांचा आढावा घेतला.
यावेळी या योजनांसंदर्भातील कामांची स्थिती जाणून घेण्यासाठी नागरिकांच्या तक्रारी सुद्धा ऐकून घेतल्या तर या कल्याणकारी योजना तात्काळ पूर्ण व्हाव्यात यासाठी गावित यांनी या बैठकीमध्ये आक्रमक होत कोणत्याही परिस्थितीत माझ्या लोकांना लवकरात लवकर पाणी उपलब्ध व्हायला हवे अशी तंबी सुद्धा उपस्थित अधिकाऱ्यांना दिली.
पाणीपुरवठा योजना मंजूर केल्यानंतर त्या वेळेत पूर्ण होत नसल्याने गावित यांनी नाराजी व्यक्त केली. कारण की एखाद्या गावच्या मूलभूत गरजांपैकी पाणीही महत्त्वाची गरज असून त्यातूनच गावाचा विकास आणि समृद्धी ठरते यासाठी माझ्या मतदारसंघातील अनेक गावपाड्यातील पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात मला यश आले असून त्या लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी मी हवी ती मदत प्रशासनाला करायला तयार आहे. मात्र या कामांमध्ये आता चालढकल होता कामा नये अशा सूचना देखील गावित यांनी यावेळी केल्या.
तसेच यावेळी केळवे माहीम भागात बुलेट ट्रेनच्या मोठे खांब टाकण्याचे काम सुरू असताना खडकाळ भागात स्फोट केल्याने त्या भागातील घरांना तडे गेल्याने त्याची भरपाई तातडीने द्यावी त्याचप्रमाणे बुलेट ट्रेनचे काम सुरू आहे तेथील भरपाई शिवाय आजूबाजूच्या ज्या मोकळ्या जागा आहेत. त्या सुद्धा काहीच कामी येणार नसल्याने त्याचा सुद्धा सगळे होऊन त्या जागांची सुद्धा भरपाई लाभार्थ्यांना व्हावी अशा सूचना देखील उपस्थित अधिकाऱ्यांना गावी त्यांनी केल्या.