Palghar dam overflow pudhari photo
पालघर

Palghar dam overflow : केळवे धरण १०० टक्के भरले; धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

संरक्षक भिंतीचा काही भाग निखळला

पुढारी वृत्तसेवा

पालघर : पालघर तालुक्यातील महिम केळवा लघु पाटबंधारे योजनेअंतर्गत असलेले झांजरोळी येथील धरण मुसळधार पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरले भरल्यामुळे या बंधाऱ्याचा संरक्षक भिंतीचा काही भाग निखळल्याची घटना घडली आहे. धरण पूर्ण क्षमतेने २.९५१ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. त्याचप्रमाणे घटनेची माहिती मिळा ल्यानंतर जिल्हाधिकारी व प्रशासनाचे अधिकारी, एनडीआ रएफचे पथक घटनास्थळी आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

पश्चिम रेल्वेच्या मुंबई-सुरत मार्गावरील केळवा रोड स्थानकाजवळील पालघर तालुक्यातील झांजरोळी गावानाजीक स्थानिक नाल्यावर उभारण्यात सिंचनासाठी हे धरण उभारण्यात आले आहे. धरणातील जलसाठ्याची पातळी ३.२४२ दलघमी इतकी असून पालघर तालुक्यात बरसलेल्या मुसळधार पावसामुळे हे धरण १०० टक्के भरले आहे.

या धरणाच्या विसर्ग होण्याच्या भागातील बाहेरील बाजूस असल्याने संरक्षक दगड आणि त्यातील माती अचानक निखळून पडल्याचे सोमवारी सकाळच्या सुमारास आढळून आले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर तातडीने याबाबत उपाययोजना करण्यास सुरुवात करण्यात आली. वाढत्या पाणीसा ठ्यामुळे नियमानुसार पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पाण्याची आवक वाढल्याने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

तात्पुरत्या तातडीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत धरण परिसरात धूप रोखण्यासाठी आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी गोण्या व दगडांच्या साहाय्याने मजबुतीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमवेत घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली व परिस्थितीचा संपूर्ण आढावा घेतला.

परिसरातील प्रभावित होऊ शकणाऱ्या आठ गावांपैकी चार गावे अतिसंवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. या गावांमध्ये सुमारे १३० कुटुंबे असून त्यापैकी ६५ कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे, तर उर्वरित ६५ कुटुंबांचे स्थलांतर सुरू होते. नागरिकांच्या सुर क्षिततेसाठी एनडीआरएफचे पथक परिसरात तैनात करण्यात आले असून स्थलांतर प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू करण्यात आले.

दसमाळा, भुतान माळ, झांझरोळी,भरणपाडा, टोकराळे, देवीपाडा, देवशेत पाडा, मायखोप, पाटीलपाडा, पळगेपाडा, तरडेपाडा, बेंदळी, राठे, खलपाडा आणि माकुणसार या आणि परिसरातील गावांतील नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशासनामार्फत पाण्याचा प्रवाह आणि विसर्गावर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. पाण्याचा प्रवाह आणखी वाढल्यास अतिरिक्त विशेष सुरक्षा उपाययोजना आणि आपत्कालीन व्यवस्था तात्काळ करण्यात येणार आहेत. जिल्हा प्रशासन, जलसंपदा विभाग, पोलीस विभाग, महसूल विभाग तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा संयुक्तपणे परि-स्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT