Palghar Police New Vehicles Pudhari
पालघर

Palghar Police New Vehicles: पालघर पोलिसांना 41 नव्या वाहनांची मंजुरी; 17 गाड्या लवकरच दाखल होणार

बोलेरो वाहनांमुळे पोलिसांचा वेग वाढणार; गुन्हे उकल व कारवाई अधिक प्रभावी होणार

पुढारी वृत्तसेवा

पालघर : हनिफ शेख

अनेक गुन्ह्यांची तातडीने उकल करण्यामध्ये पालघर जिल्हा पोलीस सरस ठरले असल्याने पालघर जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला बनतोय असे असतानाच आता पालघर जिल्ह्यातील पोलिसांचा वेग देखील वाढणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे. कारण की प्रत्येक पोलीस स्टेशनला अतिशय महत्त्वाचं असतं ते पोलिसांची वाहन गेल्या काही वर्षात नवीन वाहन खरेदी झालेली नसल्याने जुन्याच गाड्यांच्या आधारे पोलीस आपले काम करत आहेत. मात्र आता 41 नवीन वाहनांना मंजुरी मिळाली असून यातील 17 पोलीस वाहनांवर दिवे बसविणे वायरलेस सिस्टीम बसवणे याशिवाय रेडियम अशी कामे सुरू असून लवकरच ही वाहने आवश्यकतेनुसार प्रधान यांनी त्या त्या पोलीस स्टेशनला देण्यात येणार आहे. यामुळे पोलिसांना करावयाच्या कारवाईचा वेग देखील वाढणार असल्याचे दिसून येत आहे.

मुळात कोणत्याही पोलीस स्टेशनचा सर्वात महत्त्वाचा सहभाग हा पोलीस वाहन हेच असते. कारण की रात्री बे रात्री कुठेही गुन्हा घडला की सर्वात अगोदर पोलीस वाहनाची आवश्यकता पडते.अशावेळी खाजगी वाहनाचा आधार घेता येत नाही. यामुळे पोलिसांना हक्काचे ते सुस्थितीत असणारे वाहन हवे असते. यामुळे आता या नवीन वाहनांच्या येण्याने पोलिसांचा वेग वाढेल पर्यायाने गुन्हेगारी रोखणे आणि कारवाई करणे याचाही वेग वाढणार आहे.

पालघर जिल्ह्यात 16 पोलीस स्टेशन आणि 4 उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आहेत. यातूनच येथील पोलिसांचा कारभार बघितला जातो. सर्व पोलीस स्टेशनला पोलीस वाहन असणे आवश्यक आहे. मात्र केवळ एका वाहनाने कधीही पोलीस स्टेशनची तहान भागत नाही. यामुळे तेथील गुन्हेगारीचे प्रमाण भौगोलिक परिस्थिती हे पाहता आवश्यकतेनुसार दोन किंवा त्यापेक्षा अधिक वाहने असणे आवश्यक आहे. याशिवाय त्या वाहनांची स्थिती देखील व्यवस्थित असणे गरजेचे आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून अनेक पोलीस स्टेशनची वाहने जुनी झाल्याने अनेकदा अशी पोलीस वाहने गॅरेजला दिसून येतात.

तर कधी कधी कामाच्या वेळी वाहनांमध्ये बिघाड झाल्यास अनेक वेळा गुन्हेगारी स्वरूपाच्या वाहनांचा पाठलाग करणे मुश्किल होते. तर कित्येक वेळी अतिशय विस्तृत पसरलेल्या जिल्ह्यातील दुर्गम भागातील पोलीस स्टेशन मधून आरोपी पालघर किंवा ठाणे या ठिकाणी कोर्ट कमी नेण्याकरिता देखील अशा वाहनांची गरज असते आणि जर अशावेळी ज्या पोलीस स्टेशनला वाहनांची कमतरता आहे तेथील एक वाहन जर विविध कामासाठी बाहेर गेले तर मात्र पोलीस स्टेशन मधील दुसरी कामे करणे अतिशय अवघड जाते अशावेळी अनेकदा खाजगी वाहनांचा देखील वापर पोलिसांना करावा लागतो.

यामुळे पोलीस स्टेशनला पोलिसांसाठी अधिक वाहने असणे आवश्यक असते काही वर्षांपूर्वी ट्रॅफिक पोलिसांसाठी बाईक सुद्धा दिल्याचे चित्र होते.मात्र कालांतराने अशा वाहनांमध्ये मोठे बिघाड आल्यानंतर बऱ्याचदा अनेक वाहने गॅरेजलाच पडून राहिले ते दिसून येते. मात्र आता पालघर पोलिसांच्या वाहनांची गरज ओळखून जिल्ह्यासाठी बोलेरो कंपनीच्या तब्बल 41 वाहनांना मंजुरी मिळाल्याचे दिसून येत आहे. त्यातील 17 वाहने ताब्यात मिळून पोलीस वाहनासाठी आवश्यक दिवे वायरलेस सिस्टीम सायरन याशिवाय पोलीस नाव असलेले रेडियम अशी कामे सुरू असल्याची माहिती समोर येत

आहे लवकरच या सर्व वाहनांचा लोकार्पण सोहळा देखील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे समजते. यामुळे विविध पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे तर ही वाहने पोलीस स्टेशन बरोबरच मोठ्या तालुक्यांमध्ये काम सोपे जावे यासाठी उभारलेल्या दुरक्षेत्रासाठी देखील स्पेशल वाहने द्यावीत जेणेकरून तेथील कायदा सुव्यवस्था अबाधित राखता येऊ शकेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT