Rohit Gavit Arrest Pudhari
पालघर

Rohit Gavit Arrest: आमदार पुत्र रोहित गावित यांना बेड्या; मिरा रोड येथील हॉटेलमधून पालघर पोलिसांनी केली अटक

या अटक केल्याने आता इतर आरोपीना पकडण्यात काही प्रमाणात मदत होईल अशी आशा निर्माण झाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

पालघर: पालघर येथील हॉस्पिटल मारहाण प्रकरणातील फरार 9 आरोपी पैकी पालघरचे आमदार गावित यांचे पुत्र रोहित गावित यांना पालघर पोलिसांनी अखेर मिरा रोड येथील एका हॉटेलमधून अटक केली आहे.

गेली चार दिवस पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेले आमदार पुत्र अखेर गजाआड करण्यात पालघर पोलिसांना यश आले. या अटक केल्याने आता इतर आरोपीना पकडण्यात काही प्रमाणात मदत होईल अशी आशा निर्माण झाली आहे.

उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान फरार आरोपींना पालघर पोलीस कधी पकडतात? असा सवाल सर्वत्र विचारला जातं होता. पालघर स्थानिक गुन्हे शाखा यांची पथक आरोपीच्या मागावर होते. पालघर तालुक्याचे आमदार गावीत यांचे चिरंजीव पहिल्याच दिवशी पोलीस ठाण्यात हजर झाले होते.

मात्र सुप्रीम कोर्टाचे रमेश म्हात्रे प्रकरणात कडक धोरण समोर आल्यावर पोलीस ठाण्यातून त्यांनी गुपचूप पळ काढला होता. आरोपी पळून गेल्याने उच्चं न्यायालयाने पालघर पोलिसांना पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांना फटकारले होते. शनिवारी सकाळी न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

शुक्रवारी सकाळी पालघर न्यायालयाने आरोपींच्या नावे अटक वॉरंट काढण्यासाठी पोलिसांनी केलेली विनंती यावर निकाल देताना पोलिसांनी 35( 1) प्रमाणे कारवाई करावी पोलिसांना त्या अधिकार आहेत असे निर्देश देत थेट फरार आरोपींच्या नावे अटक वोरंट काढण्याचे टाळले. रोहित गावित यांनी शिवसेना पक्षातर्फे पालघर जिल्हा परिषदेची वनई गटातून पोटनिवडणूक लढवली होती.

त्यावेळेस ते तिसऱ्या स्थानी फेकले गेले होते. भाजपच्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव करत आला होता. यावेळेस काँग्रेसच्या महिला उमेदवारांनी त्यांच्यापेक्षा जास्त मते मिळवली होती. कुंदन संखे, साईराज पाटील, मनीष संखे ,राहुल संखे, नगरसेवक नीलम संखे मनोज घरत आदींचा शोध अद्यापही सुरू आहे. दोन दिवसापूर्वी आरोपी शिर्डीत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. मात्र त्या ठिकाणी त्यांनी पळ काढल्याने त्यांना पकडण्यासाठी पोलिसांना जंग-जंग पछाडवे लागत आहे.

पोलीस कोठडी

शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पाहिजे असलेल्या आरोपींपैकी नऊ आरोपी जे दहीहंडी पथकातील तरुण होते. त्यांना पालघर पोलिसांनी ताब्यात घेऊन सकाळी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT