Panvel Traffic Plan: गणेशोत्सवात पनवेल शहरात विशेष वाहतूक व्यवस्था; सात ठिकाणी वाहनतळ; वाहतूक कोंडी टाळणार

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. विविध ठिकाणी पार्किंगची व्यवस्था असून उरण नाका–टपाल नाका मार्गावर वाहनांना प्रवेशबंदी राहणार आहे.
Panvel Traffic Plan
Panvel Traffic PlanPudhari
Published on
Updated on

खांदा कॉलनी: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरातील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी पनवेल शहर वाहतूक शाखा आणि पनवेल महानगरपालिकेने विशेष वाहतूक नियोजन केले आहे.

गर्दीच्या काळात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी शहरातील विविध मार्गांवर आवश्यकतेनुसार एकेरी वाहतूक, सम-विषम पार्किंग आणि बॅरिकेटिंग करण्यात येणार आहे. गणेशभक्तांनी रस्त्यावर अनधिकृतपणे वाहने पार्क न करता प्रशासनाने निश्चित केलेल्या वाहनतळांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.

Panvel Traffic Plan
Varandha Ghat ST Bus Service: वरंधा घाटातून बससेवा पूर्ववत करण्याचा मार्ग सुकर; गोगावल्यांच्या प्रयत्नांना यश!

गणेशोत्सव काळात फडके नाट्यगृहासमोरील मराठी शाळा, नवीन तहसील कार्यालय, टपाल नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या परिसरात, कर्नाळा सर्कलजवळील विविध जागा, लाईन आळी रोड तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागील बाजूस दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

मागील अधिसूचनेनुसार उरण नाका येथून टपाल नाक्याकडे येणाऱ्या मार्गावर रिक्षा व चारचाकी वाहनांना प्रवेशबंदी राहणार आहे. ही वाहने उरण नाका–पंचरत्न सर्कलमार्गे इच्छितस्थळी जाऊ शकतील.गणेशोत्सव काळात हा मार्ग दुचाकी तसेच इतर वाहनांसाठी बंद राहणार आहे.

Panvel Traffic Plan
Konkan Ganeshotsav Traffic: गणेशोत्सवात महामार्गाला पोलिसांचा ‘ब्रेक’! रस्त्याच्या दुतर्फा ‘नो पार्किंग झोन’ घोषित

कर्नाळा फुल मार्केट ते कर्मवीर भाऊराव चौक या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून, या परिसरात बाजाराची व्यवस्था करण्यात येणार आहे. उरण नाका ते टपाल नाका परिसरातील व्यापाऱ्यांची बैठक घेऊन जड व अवजड करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news