पालघर

Crime News : तडीपार आरोपीला भाईंदरमधून अटक

अनुराधा कोरवी

मिरा रोड : मिरा भाईंदरमध्ये वारंवार गुन्हेगारी कारवाया करणार्‍या आरोपीला ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर व पालघर या चार जिल्हयातून तडीपार करण्यात आले होते. तडीपार असताना देखील आरोपी भाईंदर येथे आला असताना मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेने आरोपीला अटक करून नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ( Crime News )

संबंधित बातम्या 

भाईंदर येथील तडीपार केलेला आरोपी सुदर्शन खंदारे (32 ) हा इंदिरा नगर येथे येणार असल्याची माहिती मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून तडीपार व्यक्तीचा शोध घेण्यासाठी भाईंदर पूर्व येथील शंकर नारायण कॉलेज रोड जवळ दबा धरून बसले. काही वेळाने तो आला असता त्याला ताब्यात घेतले.

सुदर्शन वारंवार गुन्हेगारी कारवाया करत असल्यामुळे त्याला पोलीस उप आयुक्त, मिरा-भाईदर, परीमंडळ 1 यांनी 1 जुलै 2023 रोजी महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगरे या चार जिल्यातून एक वर्षासाठी तडिपार केले आहे. ( Crime News )

SCROLL FOR NEXT