Rickshaw Stunt Pudhari
पालघर

Rickshaw Stunt: कळंब समुद्रकिनारी रिक्षाचालकाची स्टंटबाजी; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

रिक्षाचालकाच्या जीवघेण्या स्टंटबाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पुढारी वृत्तसेवा

वसईः धोकादायक रिल्स बनवून ते सोशल मिडियावर पोस्ट करण्याची सध्या स्पर्धा सर्वत्र पहायला मिळत आहे. नालासोपारा येथील कळंब समुद्रकिनारी एका रिक्षाचालकाने असाच धोकादायक रील्स बनवून जीव धोक्यात घातल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.

कळंब समुद्रकिनारी एका रिक्षा चालकाने रील बनवण्यासाठी रिक्षा गोल गोल फरवून धोकादायक स्टंटबाजी केल्याचं समोर आलं आहे. रिक्षाचालकाच्या जीवघेण्या स्टंटबाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रिक्षा समुद्र किनारी गोल गोल फिरवून हा चालक स्टंटबाजीचा व्हिडीओ शूट करत होता. परंतु,स्टंटबाजी करताना रिक्षाच पलटी झाली अन्‌‍ चालकाची चांगलीच तारांबळ उडाली. सुदैवाने या घटनेत रिक्षाचालकाला दुखापत झाली नाही. मात्र ही स्टंटबाजी चांगलीच अंगलट आली असती.

दरम्यान वाढत्या सोशल मिडीयाच्या वापरामुळे जीवघेण्या स्टंटबाजीचे अनेक व्हिडीओ सध्या समोर येत आहे. फॉलोअर्स वाढवण्यासाठी काही लोक जीव धोक्यात टाकून वाहनांची स्टंटबाजी करतात. त्यामुळे पोलिसांनी अशा चालकांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT