Talasari Murder Case pudhari photo
पालघर

Palghar Crime : तलासरीत प्रेमसंबंधातून हत्या

हत्येचा 24 तासांच्या आत उलगडा; आरोपीच्या मुसक्या आवळल्या

पुढारी वृत्तसेवा

तलासरी: सुरेश वळवी

तालुक्यातील कुर्झे धरण येथील पायथ्याशी घडलेल्या एका हत्येचा उलगडला तलासरी पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत करून आरोपींना अटक केली आहे. प्रेम संबंधातून हत्या झाल्याचे उघड झाले आहे.

तलासरी तालुक्यातील कुर्झे येथे धरणाच्या पायथ्याशी तीस वर्षीय इतनेसभाई माच्छी या 30 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली होती. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व तलासरी पोलीस ठाणे यांची वेगवेगळे तपास पथके तयार करून तपास वेगाने सुरू करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे शाखे कडील तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीच्या मुस्क्या आवळळ्या असून 24 तासात अटक करण्यात आले आहे. दोन्ही आरोपी नवरा बायको असून जेरी बाबू माच्छी वय 36 वर्ष, श्रीमती जेरी माच्छी अशी नावे असून राहणार पलगाम गुजरात राज्यातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आले असून पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

मयत आणि पत्नीच्या अनैतिक संबंधाबाबतची माहिती आरोपी पतीला समजल्यानंतर अनेक वेळा समजावून देखील मयत आणि पत्नीमध्ये प्रेम संबंध सुरूच असल्याने याचा राग मनात धरून आरोपी हत्या करणाऱ्या पतीने पत्नीच्या संगणमतानेच प्रियकराला कुर्झे येथे बोलावून त्याची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये प्रेयसी पत्नी तिने मृत प्रियकर यास पतीचा सांगण्यावरून कुर्झे येथे मयत इतनेसला दारू पाजून आरोपी पतीस बोलावून घेत त्याच्यावर वार करत त्याची हत्या केली.

या संपूर्ण घटनेची माहिती मिळतात स्थानिक पोलिसासह स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची वेगवेगळे पथक आरोपीच्या शोधासाठी प्रयत्न करत होते. या तपासामध्ये पोलीस अधीक्षक पालघर यतीश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नराळे, विभागीय पोलीस अधिकारी अंकिता कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल सावंत देसाई, रोहित खोत, गोरखनाथ राठोड पोलीस हवालदार दिनेश गायकवाड, कैलास पाटील, नरेंद्र पाटील, यांनी केली.

  • गोपनीय आणि तांत्रिक माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांच्या पथकाने गुजरात राज्यातील संजान, उंबरगाव, पलगाम इत्यादी भागात हत्या करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी पतीला ताब्यात घेत चौकशी केली असता सदर घटनेची व हत्तेमागील कारणांचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेला करता आला या संपूर्ण प्रकरणात आरोपी पतीची पत्नी देखील सहभागी असल्याने तिलाही अटक करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT