Gadchiroali Murder | महिलेचा खून करणाऱ्या दोघांना १२ तासांच्या आत अटक

तांत्रिक पुराव्यांच्या आधारावर पोलिसांची कारवाई
Gadchiroali Murder | महिलेचा खून करणाऱ्या दोघांना १२ तासांच्या आत अटक
Gadchiroali Murder | महिलेचा खून करणाऱ्या दोघांना १२ तासांच्या आत अटक
Published on
Updated on

गडचिरोली : पूर्व वैमनस्यातून महिलेचा खून करणाऱ्या दोघांना गडचिरोली पोलिसांनी १२ तासांच्या आत अटक केली आहे. केवळ तांत्रिक पुराव्यांच्या आधारावर पोलिसांनी ही कारवाई केली असून, याप्रकरणी एका विधिसंघर्षित बालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुदामा रामभाऊ चौधरी(३३),रा.शिरसगाव, ता.संगमनेर, जि.अहिल्यानगर व चेतन धर्मराव खोब्रागडे(२१), रा.इंदिरानगर, गडचिरोली अशी आरोपींची नावे आहेत.

८ मेच्या संध्याकाळी गडचिरोली तालुक्यातील मेंढा येथे अक्षय भानारकर याच्या राहत्या घरी शामकला. सुखदेव किरंगे या ४० वर्षीय महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. ती कुरखेडा तालुक्यातील हिडदा येथील रहिवासी होती. फिर्यादीनंतर पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यावर गुन्हा दाखल केला. परंतु गुन्हा अत्यंत गंभीर स्वरुपाचा असल्याने आरोपींचा शोध घेणे पोलिसांपुढे आव्हान होते. त्यामुळे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची तपास पथके तयार करण्यात आली.

त्यांनी गोपनीय माहिती आणि केवळ तांत्रिक पुराव्यांच्या आधारे सुदामा रामभाऊ चौधरी यास चंद्रपुरातून ताब्यात घेतले. विचारपूस केली असता सुदामा चौधरी याने पूर्व वैमनस्यातून दोन सहकाऱ्यांच्या मदतीने श्यामकला किरंगे हिचा धारदार शस्त्राने खून केल्याचे कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी सुदामा चौधरी व चेतन खोब्रागडे यांना अटक केली. शिवाय आरोपींना पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या विधिसंघर्षित बालकावरही गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक अतुल तराळे गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

पोलिस अधीक्षक एम.रमेश, अपर पोलिस अधीक्षक गोकुल राज जी, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिकेत हिरडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण फेगडे, सहायक पोलिस निरीक्षक भगतसिंह दुल्हत, पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण, उपनिरीक्षक शिवाजी देशमुख, माधुरी मिसाळ, भावना राऊत आदींनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news