Latur Crime : घरफोडी करणाऱ्या टोळीच्या मुख्य आरोपीस अटक

32 गुन्ह्यांत सहभाग, पोलिसांची कारवाई
Latur burglary gang arrest
घरफोडी करणाऱ्या टोळीच्या मुख्य आरोपीस अटकpudhari photo
Published on
Updated on

लातूर : लातूर, धाराशिव, सोलापूर आणि कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात मागील दीड ते दोन वर्षांपासून सुरू असलेल्या घरफोडी व चोरीच्या घटनांचा पदार्फाश करण्यात लातूर पोलीस यशस्वी ठरले असून स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष कारवाईत या टोळीतील मुख्य आरोपी सुनिल उर्फ काळ्या श्रावण शिंदे (वय 24, रा. सुंभा, धाराशिव) याला अटक करण्यात आली आहे.

लातूर जिल्हा तसेच शेजारील धाराशिव, सोलापूर व कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात मागील दीड ते दोन वर्षांपासून सुरू असलेल्या घरफोडी व चोरीच्या सलग घटना घडत होत्या.बंद घरांचे कुलूप तोडून दागिने व रोख रक्कम चोरी करणारी ही टोळी अत्यंत चलाख पद्धतीने गुन्हे करीत असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. मात्र, पोलीस अधीक्षक, अमोल तांबे लातूर यांच्या सूचनांनुसार अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेने राबविलेल्या विशेष कारवाईत या गुन्हेगारी टोळीतील मुख्य व कुख्यात आरोपीस अटक करण्यात यश मिळवले आहे.

Latur burglary gang arrest
Crime News : दिवसा घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

बावकर यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने गुप्त माहितीच्या 24 एप्रिल रोजी उजनी येथील उड्डाणपुलाखाली सापळा रचला. या कारवाईदरम्यान सुनिल उर्फ काळ्या श्रावण शिंदे (वय 24 वर्षे, रा. सुंभा, ता. जि. धाराशिव) हा रेकॉर्डवरील व फरार आरोपीला पोलिसांच्या ताब्यात घेतले व त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी,3 ग्रॅम वजनाची सोन्याची ठुशी रोख रक्कम असा एकूण 35 हाजर रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरोपीने आपल्या साथीदारांसह लातूर, धाराशिव, सोलापूर तसेच कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोडी, चोरी केल्याची कबुली दिली. लातूर जिल्ह्यात 28, धाराशिवमध्ये 4, सोलापूरमध्ये 5 आणि बिदरमध्ये 3 गुन्हे अशा 32 गुन्ह्यांमध्ये आरोपींचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले असून पुढील तपासात गुन्ह्यांची संख्या वाढू शकते .टोळी मधील काही आरोपींना या अगोदरच अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

Latur burglary gang arrest
Jalna Grant Scam : अनुदान घोटाळा, तलाठी पवनसिंग सलाने यास सहा दिवसांची कोठडी

ही कारवाई पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ, पोलीस अमलदार माधव बिल्लापटे, नवनाथ हासबे, रामलिंग शिंदे, तुराब पठाण, राजेश कंचे, गणेश साठे, श्रीनिवास जांभळे, शैलेश सुडे, अंजली गायकवाड यांच्या पथकाने यशस्वी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news