मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गाचे काम पूर्णत्वाच्या दिशेने pudhari photo
पालघर

Mumbai Vadodara Expressway : मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गाचे काम पूर्णत्वाच्या दिशेने

पालघर जिल्ह्याच्या हद्दीतील महामार्गाचे काम 85 टक्के झाले पूर्ण

पुढारी वृत्तसेवा

पालघर ः मुंबई बडोदा दृतगती महामार्गाच्या कामाने गती घेतली असून पालघर जिल्ह्याच्या हद्दीतील महामार्गाचे काम 85 टक्के पूर्ण झाले आहे.पालघर जिल्ह्यातील तलासरी ते डहाणू तालुक्याच्या हद्दीतील टप्प्यात भराव आणि काँक्रीटीकरणाचे काम 95 टक्के पर्यंत पूर्ण झाले आहे.उर्वरित टप्प्याची प्रगती 85 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.

पालघर जिल्ह्यातील महामार्गाची कामे येत्या एप्रिल महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा कडून देण्यात आली आहे.सद्य स्थितीत सोनावे आणि दहिवाले गावा दरम्यान वैतरणा नदीवरील पूलाचे बांधकाम पूर्ण करण्याच्या कामाकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पालघर जिल्ह्याच्या हद्दीतील नाद्यांवरील बहुतांश पुलांची बांधकामे पूर्ण करण्यात आली आहेत.

मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्ग दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडोर चा भाग आहे. मुंबई ते वडोदरा दृतगती महामार्गाची लांबी 380 किलोमीटर असून पालघर जिल्ह्यात 120 किलोमीटर लांबीचा भाग महत्त्वाचा आहे.महामार्गामुळे डोंगराळ भाग, नद्या, वनक्षेत्राचा मोठा भाग बाधित झाला.

भूसंपादन प्रक्रिया, पर्यावरणीय मंजुरी,स्थानिक शेतकऱ्यांच्या समस्या आणि वनविभागाच्या जमिनी आदी अडचणी निर्माण झाल्या होत्या. 2020-21 दरम्यान कोरोना प्रादुर्भावामुळे काम सुरु होण्यासाठी विलंब झाला होता.मुंबई बडोदा दृतगती महामार्गाचे पालघर जिल्ह्यातील काम 2021 च्या अखेरीस सुरू झाले होते.

पालघर जिल्ह्यातील 120 किलोमीटर लांबी पैकी अंदाजे 85 टक्के काम पूर्ण झाले आहे.सोनावे आणि दहीवाले गावा दरम्यानच्या वैतरणा नदीवरील पुलाचे बांधकाम प्रगती पथावर आहे.रस्त्याच्या निर्मितीसाठी माती-मुरुम भरावाचे काम 90 टक्के झाले आहे. महामार्गाच्या आरेखनात संरक्षित वनक्षेत्र आणि खाडी क्षेत्रातील कांदळवनामुळे राष्ट्रीय हरित प्राधिकरणाच्या निर्बंधांना सामोरे जावे लागले होते. कामाला सुरुवात झाल्यानंतर मान्सून कालावधीत जुलै-सप्टेंबर दरम्यानच्या जोरदार पावसामुळे कामाची गती मंदावली होती.तसेच बाधित शेतकऱ्यांनी भूसंपादना प्रकरणी न्यायालयीन दावे दाखल केल्याने महामार्ग निर्मितीत आव्हाने उभी राहिली होती.

पालघर जिल्ह्यातील तलासरी ते डहाणू तालुक्याच्या हद्दीतील टप्प्याचे काम 95 टक्के पर्यंत पूर्ण झाले आहे.उर्वरित टप्प्याची प्रगती 85 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.पालघर जिल्ह्यातील महामार्गाची कामे येत्या एप्रिल महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून व्यक्त करण्यात आली आहे.बहुतांश नद्यांवरील पूलांची बांधकामे पूर्ण झाली आहेत.

मुंबई बडोदा दृतगती महामार्गामुळे मुंबई-वडोदरा दरम्यानच्या प्रवासातील वेळेत घट होणार आह.उरण स्थित जेएनपीटी बंदर, कोकण,गोवा आणि पुण्याच्या दिशेने जाणारी अवजड वाहनांच्या संख्येत घट होणार असल्यामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्याची शक्यता आहे.मुंबई बडोदा दृतगती महामार्गामुळे जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला हातभार लागणार आहे.जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील उत्पादन आणि कृषी उत्पादनांची वाहतुक सुलभ होणार आहे.

पालघर जिल्ह्यातील मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे.काही तांत्रिक कारणांमुळे निर्माण झालेले अडथळे दुर झाले असून एप्रिल 2025 पर्यंत पालघर जिल्ह्यातील कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.

पालघर जिल्ह्यातील एका टप्प्याचे काम 95 टक्क्यापर्यत उर्वरित दोन टप्प्याची प्रगती 85 टक्के झाली आहे.येत्या एप्रिल महिन्या पर्यंत तिन्ही टप्प्यातील कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
सुहास चिटणीस, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, ठाणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT