Palghar Infant Murder  Online Pudhari
पालघर

Palghar Infant Murder | चौथ्यांदा मुलगी झाल्याच्या दुःखात जन्मदातीकडून बाळाचा घोटला गळा

Dahanu Infant Murder | डहाणूतील लोणीपाडा येथे हृदयद्रावक

पुढारी वृत्तसेवा

mother-kills-newborn-girl-dahanu-palghar-crime

पालघर, डहाणू : डहाणू शहरातील लोणीपाडा भागात घडलेल्या एका धक्कादायक घटनेत, चौथे अपत्यही मुलगी झाल्याच्या नैराश्यात एका आईने आपल्या नवजात चिमुरडीचा गुदमरवून जीव घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्री डहाणू उपजिल्हा रुग्णालयात घडली. याप्रकरणी डहाणू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पूनम शहा (मूळ रा. उत्तर प्रदेश, सध्या लोणीपाडा, डहाणू) या महिलेने काही दिवसांपूर्वी गृहप्रसूत झाल्यानंतर डहाणू उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चौथे अपत्य मुलगी झाल्याचे कळल्यानंतर ती नैराश्यात गेली होती. शनिवारी मध्यरात्री तिने नवजात मुलीचे नाकतोंड दाबून तिचा श्वास घोटला आणि तिचा जीव घेतला.

घटनेची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासनाने तत्काळ पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृत बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पूनम शहा हिला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

पूनम शहा ही मूळची उत्तर प्रदेशातील असून तिचे सासर कोलकत्त्यात आहे. सध्या ती काही काळासाठी लोणीपाडा येथे राहणाऱ्या आपल्या आईवडिलांकडे आली होती.

या संपूर्ण प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी भागीरथी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलिसांनी तपासाला गती दिली असून घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT