मोखाडा : तालुक्यातील चप्पल पाडा या जिल्हा परिषद शाळेतील 14 विद्यार्थी हे मोखाडा तालुका शाळेला क्रीडा स्पर्धांसाठी जात होते.त्यावेळी या विद्यार्थ्यांना एका खाजगी पिकपद्वारे हा प्रवास करावा लागला. यावेळी पिकअप वाहनाला अपघात झाला. या अपघातात विद्यार्थ्यांना किरकोळ मार लागला आहे. मात्र एका विद्यार्थ्यांचे मांडीचे हाड तुटल्याने त्याला नाशिक या ठिकाणी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हा अपघात तसा मोठा होता मात्र सुदैवाने जीवित हानी टळली आहे. मात्र शालेय विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धांसाठी अशा पिकअप द्वारे पाठविण्याच्या या प्रकाराबद्दल मात्र नाराजी व्यक्त होत असून याशिवाय या विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकही नसल्याचे आता समोर येत आहे यातूनच शाळा मुख्याध्यापक आणि शिक्षकांची बेफिकिरी समोर येत आहे.
सध्या तालुक्यात अनेक शालेय स्पर्धा सुरू आहेत. यासाठी केंद्र शाळेत या स्पर्धा ठेवण्यात येतात अशावेळी शाळेतून स्पर्धेचे ठिकाणी जाण्यासाठी शाळेकडूनच एखाद्या वाहनाची व्यवस्था होणे गरजेचे आहे. कारण की अनेक वेळा विद्यार्थी एकटे जातात त्यातूनच काही गैरप्रकार सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र या प्रकरणात देखील तसेच झाले चप्पल पाड्यावरून सातपूर निवाशाळा मार्गे जाणाऱ्या पिकप वाहनाने दोन ते तीन पलटी मारल्याचे दिसून येत आहे. मात्र सुदैवाने विद्यार्थी बचावले आहेत.
काही विद्यार्थ्यांना मोखाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार देऊन घरी सोडण्यात आले आहे. मात्र अशा प्रवासी किंवा मालवाहतूक वाहनातून विद्यार्थ्यांना बसून देणे त्यांच्यासोबत शिक्षक नसणे ही गंभीर बाब आहे. यामुळे या प्रकरणी आता शिक्षण विभाग काही कारवाई करणार की समज देऊन प्रकरण संपवणार? हे पाहणे आवश्यक राहणार आहे.
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मुलाचे नाव अरुण लाखन असून याच्यावर मोठी शस्त्रक्रिया होणार आहे. मात्र या शस्त्रक्रिया चा उपचार सर्व शिक्षक मंडळी वर्गणीतून करीत असल्याचे दिसून येत आहे या उपचाराकरिता किमान दीड ते दोन लाखांचा खर्च आहे मात्र यासाठी पालघर जिल्ह्यातील सर्व शिक्षक शिक्षक संघटनांची पदाधिकारी हे विविध प्रकारे आपापल्या परीने मदत करीत असल्याचे दिसून आले आणि यातूनच या शस्त्रक्रियेचा खर्च होणार असल्याने सर्व शिक्षकांचे अभिनंदन देखील होत आहे.