मोखाड्यात आयशर ट्रकचा भीषण अपघात pudhari photo
पालघर

Mokhada Eicher truck accident : मोखाड्यात आयशर ट्रकचा भीषण अपघात

एकाचा मृत्यू, 40 हून अधिक मजुर जखमी

पुढारी वृत्तसेवा

मोखाडा : मोखाडा त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील तोरंगण घाटात एका आयशर ट्रकचा मोठा अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये एकाचा मृत्यू तर 30 हुन अधिक मजुर प्रवासी जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. दरम्यान गंभीर जखमींना उपचारासाठी त्र्यंबकेश्वर आणि नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर काही जखमींवर मोखाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील काहींची स्थिती नाजूक असल्याचे सांगण्यात येत आहे.

मोखाडा तालुक्यातील अनेक मजूर रोजगाराच्या शोधात नाशिक या ठिकाणी कामासाठी जातात. हे मजूर रोजंदारीच्या शोधात जात असल्याने कमी पैशांमध्ये प्रवास व्हावा यासाठी मालवाहतूक करणाऱ्या अनेक वाहनांचा आधार घेत असतात अशावेळी सहा ते सातच्या आसपास नाशिक वरून मोखाड्याकडे येणाऱ्या एका आयशर ट्रक मध्ये तब्बल पन्नास हून अधिक मजूर बसले होते. यानंतर तोरंगण घाटात या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

यातील सुभाष दिवे (28) याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 30 हून अधिक जखमींवर उपचार सुरू आहेत. मोखाडा तालुक्यात सध्या स्थलांतराचे प्रमाण मोठे असताना आता दररोजचे स्थलांतर सुद्धा वाढले आहे यासाठी मोखाड्यातील अनेक मजूर मोखाडा त्रंबक रस्त्यावरील अनेक फाट्यावर येऊन उभे राहतात. कमी भाड्यामध्ये गाड्या मिळाव्या म्हणून मालवाहतूक वाहनांमध्ये प्रवास करतात आणि येताना सुद्धा मजुरी मिळाल्यानंतर अशाच वाहनांचा ते जर दिवशी आधार घेत असतात त्यातूनच आज अशाच एका वाहनात प्रवास करत असताना हा मोठा अपघात झाला आहे.

ग्रामीण रुग्णालय व्यवस्थापनाचा सूचकपणा

या घटनेची माहिती मिळताच मोकळा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भरत महाले यांनी मोखाडा ग्रामीण रुग्णालयाच्या एका व्हाट्सअप ग्रुप वर हा संदेश टाकून तातडीने उपचारासाठी सज्ज राहण्याच्या आव्हान केले याला प्रतिसाद देत ज्या नर्सेस यांची ड्युटी संपलेली होती.जे डॉक्टर ड्युटी संपवून घरी गेले होते.तो सर्वच्या सर्व स्टाफ रुग्णालयात तात्काळ हजर झाला. यावेळी अनेक डॉक्टरांनी,नर्सेस यांनी इमर्जन्सी म्हणून आहे त्यांनी रुग्णालय गाठले.यामुळे अनेकांवर वेळेत उपचार करणे शक्य झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT