Jawhar tribal wedding tradition Pudhari
पालघर

Jawhar tribal wedding tradition:लग्न, वरात, हळदीच्या दिवशी ‌‘गवत्या‌’ होडी नृत्य ठरतेय आकर्षण

आधुनिकतेच्या प्रभावातही आदिवासी समाज पारंपरिक संस्कृती चालीरीतींचे करतोय जतन

पुढारी वृत्तसेवा

जव्हार: आधुनिकतेच्या वाढत्या प्रभावातही आदिवासी समाजाने आपल्या पारंपरिक संस्कृती व चालीरीतींचे जतन करण्याची परंपरा आजही कायम राखली असून, जव्हार तालुक्यात अनेक गावांना विवाह सोहळ्यात हळदीच्या रात्री नाचकाम सुरू असतांना, विरंगुळा म्हणून मध्यरात्री गावातील महिला, पुरुष वेगवेगळी वेशभूषा परिधान करून ‌‘गवत्या‌’ होडी गावातून नाचत लग्नाचा आनंद घेत, आदिवासींनी जपलेली करणुकीची सांस्कृतिक परंपरा आजही कायम जपली जात आहे.

आदिवासी विवाह परंपरेतील ‌‘गवत्या‌’ हा केवळ एक विधी नसून पूर्वजांपासून चालत आलेल्या संस्कृती, सामाजिक, परंपरा करमणुकीचे साधन म्हणून लग्न, हळदीला आलेले वधू-वरांच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांच्या सहभागातून पारंपरिक पद्धतीने वेशभूषा परिधान करू सांबळ, ढोल-ताशांचा गजरात, नाचकाम करीत आजही लग्नात ‌‘गवत्या‌’ होडी हे नृत्ये आकर्षण ठरत आहे.

ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य

‌‘गवत्या‌’ नृत्यातून आदिवासी समाजाचे निसर्गाशी असलेले नाते, पूर्वजांच्या स्मृती आणि सामाजिक ऐक्य अधोरेखित होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणाऱ्या या परंपरेतून नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख करून दिली जात आहे.

बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक पारंपरिक चालीरिती लोप पावत असताना आदिवासी भागात मात्र अशा परंपरा आजही कायम जपल्या जात आहेत. त्यामुळे आदिवासी संस्कृतीची वेगळी ओळख आणि ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ‌‘गवत्या‌’ सारख्या परंपरांमधून होत असल्याचे ‌‘गवत्या नृत्य‌’ अनेक गावात बघायला मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT