Palghar Ambulance Drivers Protest: 102 रुग्णवाहिकाचालकांचे पालघर जिल्हा परिषदेसमोर घड्याळ आंदोलन

रुग्णवाहिकाचालकांना तात्काळ पूर्ण किमान वेतन, सर्व कायदेशीर भत्ते लागू करण्याची मागणी
Palghar Ambulance Drivers Protest
Palghar Ambulance Drivers ProtestPudhari
Published on
Updated on

पालघर शहर: 102 रुग्णवाहिका चालकांना तात्काळ पूर्ण किमान वेतन मिळावे आदींसह रुग्णवाहिका चालकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पालघर जिल्हा परिषद कार्यालयासमोर रुग्णवाहिका चालकांनी आंदोलन केले.

भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या नेतृत्वात रुग्णवाहिका चालकांनी पालघर जिल्हा परिषद कार्यालयावर धडक मोर्चा काढत घड्याळ आंदोलन केले. यावेळी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात पालघर जिल्ह्यातील 102 रुग्णवाहिका चालक आणि त्यांचे कुटुंबीय देखील सहभागी झाले.

Palghar Ambulance Drivers Protest
El Nino monsoon impact: एल निनोचे सावट गडद; ठाणे जिल्ह्यात शेती संकटाची भीती

रुग्णांच्या सेवेसाठी पालघर जिल्ह्यात मागील अनेक वर्षांपासून रुग्णवाहिका चालक आपली सेवा देत आहेत. मात्र रुग्णवाहिका चालकांकडून 24 तास काम करून घेतले जाते. 108 रुग्णवाहिका धरतीवर 102 रुग्णवाहिका चालकांनाही कामाचे तास निश्चित करणे आवश्यक आहे.

आजच्या महागाईच्या काळात 18 ते 19 हजार रुपयात संसाराचा गाडा हाकणे अशक्य असून अतोनात कष्ट करूनही पदरात पडणारे वेतन हे रुग्णवाहिका चालकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याचा आरोप भूमिपुत्र एल्गार संघटना व आंदोलक रुग्णवाहिका चालकांनी केला आहे.

Palghar Ambulance Drivers Protest
Dombivli Superstition Incident: डोंबिवलीतील वर्दळीच्या रस्त्यावर करणीचे उतारे

102 रुग्णवाहिका चालकांच्या किमान वेतन व विविध प्रलंबित मागण्यासाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या नेतृत्वात घड्याळ आंदोलन करण्यात आले. ड्युटी संपायची वेळ कधी? प्रशासनाचे हे घड्याळ या कामगारांच्या हक्काचे तास मोजणार आहे की नाही? असा सवाल रुग्णवाहिका चालकांनी यावेळी उपस्थित केला ज्यावेळी प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली.

प्रत्येक रुग्णवाहिकेवर अतिरिक्त चालक उपलब्ध करावा

सर्व 102 रुग्णवाहिका चालकांना तात्काळ पूर्ण किमान वेतन आणि सर्व कायदेशीर भत्ते लागू करण्यात यावे. 24 तासांची ड्युटी पद्धत त्वरित रद्द करून प्रत्येक रुग्णवाहिकेवर अतिरिक्त चालक उपलब्ध करून देण्यात यावा. कामाच्या ठिकाणी चालकांचे होणारे मानसिक व आर्थिक शोषण थांबून त्यांना सन्मानाची वागणूक देण्यात यावी. आदी मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून 102 रुग्णवाहिका चालकांनी केल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news