Palghar News : मिरा-भाईंदर शहरातील ध्वनी, जल प्रदूषणात वाढ File Photo
पालघर

Palghar News : मिरा-भाईंदर शहरातील ध्वनी, जल प्रदूषणात वाढ

महापालिकेकडून एक वर्षानंतर पर्यावरण अहवाल जाहीर

पुढारी वृत्तसेवा

Increase in noise, water pollution in Mira-Bhayander city

मिरा रोड : पुढारी वृत्तसेवा

मिरा-भाईंदर महापालिकेने पर्यावरण अहवाल जाहीर केला आहे या अहवालामध्ये ध्वनी व जल प्रदूषणात वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष माणजे महापालिकेने एक वर्ष जुनाच २०२३-२४ चा पर्यावरण अहवाल प्रसिद्ध केला आहे. महापालिकेने अहवाल प्रसिद्ध करण्यासाठी तब्बल एक वर्षाचा विलंब केल्याने पर्यावरणाविषयी महापालिकेला गांभिर्व नसल्याने शहरातील नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

मिरा भाईंदर शहरातील विविध भागातील ध्वनी, हवा व जल प्रदूषणाची शास्त्रीयदृष्ट्‌या चाचणी करून नागरिकांना प्रदूषणमुक्त जीवन जगण्यासाठी वातावरण सपार करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यामुळे दरवर्षी महापालिकेकडून पर्यावरण अहवाल तयार केला जातो. साधारण ३१ जुलै पूर्वी हा अहवाल प्रसिद्ध करण्याचे शासनाचे सक्त आदेश आहेत. असे असताना महापालिकेकडून गेल्या दोन वर्षांपासून पर्यावरण अहवाल प्रसिद्ध करण्यात येत नव्हता, मिरा भाईंदर शहराचा पर्यावरण अहवाल जाहीर करण्याची पर्यावरण प्रेमी नागरिकांकडून गेल्या एक वर्षांपासून मागणी केली जात होती.

परंतू महापालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत होते. अखेर पर्यावरण दिनाचे औचित्य साधत गुरुवारी महापालिका प्रशासनाने २०२३-२४ चा एक वर्ष जुनाच पर्यावरण अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात शहरातील अनेक पोकादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. महापालिकेने शाहरातील ध्वनी पातळी तपासण्यासाठी १३ ठिकाणी सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये काशीमिस नाका येथे ७३.४ डेसिबल व मिरा रोड रेल्वे स्थानक परिसरात ९४.६ डेसिबल सर्वाधिक ध्वनिप्रद्वण होत असल्याचे दिसून आले आहे.

ध्वनी पातळीची मर्यादा ६५ डेसिबल असताना देखील या दोन्ही ठिकाणी ध्वनी पातळीने ही मर्यादा ओलांडल्याचे दिसत आहे. घोडबंदर येथील फाउंटन इंटिल येथे ७२.३ डेसिबल व भाईदरयेथील केबिन रोड परिसरात ६९.८ डेसिबल ध्वनी पातळी आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होत आहे. उत्तन नाका व पाली चर्च या दोनच ठिकाणी ध्वनी पातळी मयदिच्या आत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. यामध्ये शहरातील ध्वनी व जल प्रक्षणाने काही ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडली असल्याचे समोर आले आहे. तर हवा प्रदूषणात वाढ होत असली तरी है प्रदूषण समाधानकारक पातळीच्या वर जात नसल्याचे म्हटले आहे.

पाण्याच्या गुणवत्तेत गंभीर घट

शहरातील जल खोतांच्या प्रदूषणात देखील बाढ झाली आहे. घोडबंदर, रेती बंदर खाडी, भाईंदर पश्चिम धक्का आणि घोडबंदर स्मशानभूमी नदी है जलस्रोत सर्वाधिक प्रदूषित झाले आहेत. यामध्ये जैविक आगि रासायनिक प्रदूषकांचे प्रमाण अधिक असून, त्यामुळे पाण्याच्या गुणवत्तेत गंभीर घट झाली आहे.

खारफुटी क्षेत्रांचा हास

खाड्यांमधील अतिक्रमण, अनियंत्रित विकास, प्लास्टिकचा वापर, जलप्रदूषण आणि सांडपाण्याचा निचरा यामुळे खारफुटी क्षेत्रांचा जास होऊन जलजीव आणि वन्यजीव धोक्यात आले आहेत. या वर्षीचा अहवाल प्रसिद्ध करणे बाकी आहे, या अहवालात देखील पर्यावरण खालावली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा अहवाल देखील लवकर जाहीर करण्याची मागणी पर्यावरण प्रेमी नागरिकांकडून केली जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT