Sharad Pawar on Thane Train Accident | अपघात घडल्यानंतर प्रवाशांवरच मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही : शरद पवार

Sharad Pawar | मुंब्रा रेल्वे अपघातातील मृतांना वाहिली श्रद्धांजली
Sharad Pawar News
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (File Photo)
Published on
Updated on

Thane Mumbra Train Accident Sharad Pawar Statement

मुंबई: मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या कसारा फास्ट लोकलमधून आज (दि.९) सकाळी मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ प्रवासी खाली पडल्याची दुर्घटना घडली. या अपघातात एकूण सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ही घटना सकाळी सुमारे ९.२० वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक्सवर पोस्ट करून प्रतिक्रिया दिली आहे.

मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान ट्रेनमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. सर्व निष्पाप प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच, काही प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्याही प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो.

Sharad Pawar News
Mumbai Railway Accident: धावत्या लोकल ट्रेनमधून ११ प्रवासी पडले, मृतांची आकडेवारी समोर; मुंब्रा स्थानकावरची घटना

मध्य रेल्वेवर दररोज सरासरी ६ ते ७ प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू होतो. एका आकडेवारीनुसार समोर आलेली ही माहिती अत्यंत चिंताजनक आहे. लोकल ट्रेन्समधील वाढती गर्दी याचे मुख्य कारण असल्याचे सर्वज्ञात आहे. तरीही, असे अपघात घडल्यानंतर प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही.

केंद्रीय रेल्वे प्रशासनाने या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. मध्य रेल्वेनेही वेळेचं उत्तम नियोजन करून त्यानुसार महत्त्वाच्या मार्गांवर लोकल फेऱ्या वाढविणे गरजेचे आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात. वारंवार होणाऱ्या अशा अपघातांना आळा घालण्यासाठी लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याच्या निर्णयाची विहित वेळेत अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे.

रेल्वे प्रशासनाने गर्दीचे नियोजन करण्यासाठी उपाययोजना करावी: सुप्रिया सुळे

खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की, ट्रेनमधून खाली पडल्यामुळे पाच प्रवाशांना प्राण गमावावे लागले. दिवा - मुंब्रा स्थानकादरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली. या गाडीत प्रचंड गर्दी असल्याने हे प्रवासी दरवाजात लटकून प्रवास करीत होते. अशा पद्धतीने प्रवास करणे धोकादायक आहे. नागरिकांना नम्र विनंती आहे की, कृपया आपण धोकादायक पद्धतीने प्रवास करु नये. यासोबतच रेल्वे प्रशासनाने देखील गर्दीचे नियोजन करण्यासाठी आणि संभाव्य नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करावी.

Sharad Pawar News
Thane News : गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वे तिकिटासाठी ठाणे रेल्वेस्थानकात दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news