dahanu citrus royal twinkle star club refund pudhari photo
पालघर

Palghar News : त्या गुंतवणूकदारांच्या परताव्यासाठी प्रक्रिया सुधारा

ऑफलाइन कार्यालय सुरू करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

डहाणू : ट्रस चेक इन्स आणि रॉयल ट्विंकल स्टार क्लबमध्ये गुंतवणूक केलेल्या सभासदांच्या परताव्याच्या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुलभ करावी, तालुक्याच्या ठिकाणी ऑफलाइन कार्यालय किंवा मदत केंद्र सुरू करावे, अशी मागणी रॉयल-सीट्रस सभासद व प्रतिनिधी न्यायिक संघटना, पालघरच्या वतीने करण्यात आली. याबाबत डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड, पालघर आणि मोखाडा तालुक्यांतील सुमारे ५०० प्रतिनिधींनी डहाणू येथे आमदार कॉ. विनोद निकोले यांची भेट घेऊन निवेदन दिले.

सिट्रस चेक इन्स लिमिटेड आणि रॉयल ट्विंकल स्टार क्लब प्रा. लि. या कंपन्यांमध्ये ग्रामीण भागातील अनेक नागरिकांनी गुंतवणूक केली होती. संबंधित कंपन्यांच्या आर्थिक व्यवहा-रांबाबत न्यायालयीन आणि नियामक प्रक्रिया सुरू होती.

सर्वोच्च न्यायालयाच्या विविध आदेशांनंतर पात्र गुंतवणूकदारांना परतावा देण्यासाठी समिती मार्फत प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ८ ऑगस्ट २०२४ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात उपलब्ध निधीतून पात्र गुंत-वणूकदारांना परतावा देण्याच्या प्रक्रियेचा उल्लेख असून, ए.पी. कुरेकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीची भूमिका निश्चित करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT