Ashok Dhodi Murder Case
पालघर : अविनाश धोंडी याच्या पालघर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी मुसक्या आवळल्या. अखेर शनिवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक करण्यात यश मिळवले आहे. प्रदीप पाटील पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गेली अनेक महिने अशोक धोडींची हत्या करून हा आरोपी फरार झाला होता. मुख्य आरोपीला गजाआड करण्यात पालघर पोलिसांना यश मिळाले आहे.
गेली साडेतीन महिने अविनाश धोडी पोलिसांना हुलकावण्या देत होता. मात्र प्रदीप पाटील व त्यांचे साथीदार त्याच्या मार्गावर होते. पोलीस उपनिरीक्षक सावंत देसाई, व्हटकर,पोलीस हवालदार गजानन राठोड, भगवान राठोड यांच्यासह इतर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
पालघर जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या पालघर जिल्ह्यात आल्यावर ठोस कारवाईच्या सुरवातीला हे मोठे यश आहे. कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगाराची हयगय केली जाणार नाही असे त्यांनी सांगितले.