Arrested While Taking Bribe Sarpanch Shobha Gavari
पालघर: वाडा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत सापरोंडे -मागाठणेच्या लोकनियुक्त सरपंच शोभा सुनील गवारी (36वर्षे) यांना एकोणीस हजाराची लाच घेताना लाचलूचपत ठाणे विभागाने अटक केली आहे. गावाच्या हितासाठी असलेल्या ग्रामपंचायत कार्यालय विस्तारिकरणाच्या कामासाठी मंजूर केलेल्या बिलापोटी ठेकेदाराकडून दोन टक्के म्हणजे वीस हजारांची लाच गवारी हिने मागितली होती.
वाडा तालुक्यातील सापरोंडे मागाठाणे या ग्रुप ग्रामपंचायतचे विस्तारीकरण करण्यात आले होते या कामासाठी मंजूर असलेल्या बिलासाठी काम करणाऱ्या ठेकेदाराकडून सरपंच गवारी यांनी दोन टक्के लाचेची मागणी केली होती ही रक्कम 20000 इतकी होती.
मात्र काम केल्यानंतर हे लाच मागितली जाते हे तक्रारदार ठेकेदाराला मान्य नव्हते म्हणून त्यांनी यासंदर्भातील तक्रार लाचलुचपत विभागाच्या ठाणे पथकाला दिले ठाणे पथकाने तक्रारदार यांची लाच मागितल्या प्रकरणाची तक्रार दाखल केली 24 एप्रिल रोजी पथकाने या प्रकरणाची पडताळणी केली असता पडताळणीमध्ये तथ्य आढळले.
पडताळणी मध्ये लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ठाणे पथकाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सापरोंडे गावामध्ये 25 एप्रिलला सापळा रचला सरपंच गवारी यांनी 20 हजाराच्या लाचेमध्ये तडजोड करत तक्रारदार यांच्याकडून 19 हजार रुपयांची लाच स्वीकारली लोकनियुक्त आरोपी सरपंच यांच्याकडे झाडाझडती घेतली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला त्यांच्याकडून 19 हजार रुपये व एक मोबाईल मिळून आला त्यावेळी प्रतिबंधक विभागाने सरपंच यांना ताब्यात घेतले पथकाने सरपंच गवारी हिच्या विरोधात वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने गवारी यांना तीन दिवसाची (सोमवारपर्यंत) पोलीस कोठडी दिली आहे. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक संजय गोविलकर, सुहास शिंदे, पोलीस निरीक्षक संतोष अंबिके, पोलीस कर्मचारी शेख, सुरवाडे, विशे यांनी केली आहे.