Birth Certificate Scam pudhari photo
पालघर

Palghar Birth Certificate Scam : रुग्णालयात जन्मदाखल्यांच्या नावाखाली पैशांची उकळपट्टी?

कासा उपजिल्हा रुग्णालयातील कथित प्रकाराने आरोग्य विभागात अनागोंदी उघड

पुढारी वृत्तसेवा

कासा : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कासा उपजिल्हा रुग्णालयातील कारभाराबाबत गंभीर आरोप समोर आल्याने आरोग्य विभागाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जन्मदाखला देणे व त्यामधील दुरुस्तीच्या प्रक्रियेदरम्यान नागरिकांकडून पैशांची कथित वसुली केली जात असल्याचा आरोप होत असून, या प्रकारामुळे विशेषतः आदिवासी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

आष्टे धांगडपाडा येथील मिथुन देवजी धंगडा यांनी आरोप केला की, मुलाचा जन्मदाखला मिळवण्यासाठी प्रथम रुग्णालयात गेल्यावर त्यांच्याकडून १०० रुपये घेतले गेले. त्यानंतर जन्मदाखल्यामध्ये त्रुटी असल्याने २७ जून २०२६ रोजी दुरुस्तीसाठी पुन्हा गेल्यावर १५० रुपये घेतल्याचा दावा त्यांनी केला.

"आम्ही रोजंदारीवर कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. सरकारी सेवेसाठीही पैसे मोजावे लागत असतील, तर याच्यासारखं दुर्दैवाची गोष्ट नाही असा सवाल उपस्थित केला.या सर्व आरोपांची चौकशी होणे आवश्यक आहे. सरकारी कार्यालयातच अनधिकृत वसुली, कागदपत्रांच्या प्रक्रियेत अनियमितता किंवा अधिकारांचा गैरवापर होत असेल, तर तो गंभीर प्रकार मानला जावा, अशी मागणी होत आहे.

संबंधित प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात येईल. चौकशीत संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडून कोणताही गैरप्रकार अथवा नियमभंग झाल्याचे आढळल्यास दोषी अधिकारी किंवा कर्मचाऱ्याविरुद्ध शासनाच्या प्रचलित नियमांनुसार कठोर प्रशासकीय तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
डॉ. रामदास मराड, जिल्हा शल्य चिकित्सक, पालघर .

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT