उत्तर महाराष्ट्र

नाशिकच्या चांदवड तालुक्यातील जवानाचे कर्तव्यावर असताना निधन, गावावर शोककळा

गणेश सोनवणे

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा
ओडिशा राज्यातील राऊरकेला येथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेले चांदवड तालुक्यातील कळमदरे गावचे भूमिपुत्र अर्जुन लुकाराम गांगुर्डे (50) यांचे गुरुवारी (दि. 9) कर्तव्य बजावत असताना निधन झाले. या घटनेची माहिती मिळताच समस्त गावावर शोककळा पसरली आहे. अर्जुन यांचा मृतदेह शनिवारी (दि.11) सायंकाळपर्यंत चांदवडला पोहोचणार असल्याचे नातेवाइकांनी सांगितले. वीर जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

तालुक्यातील कळमदरे येथील शेतकरी कुटुंबात अर्जुन गांगुर्डे यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच अर्जुन यांना देशसेवा करण्याची आवड होती. सन 1991 मध्ये ते केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती झाले तेव्हापासून ते आजतागायत अर्जुन गांगुर्डे यांनी कर्तव्य बजावले. जवान अर्जुन गांगुर्डे यांच्या पश्चात आई वत्सलाबाई, वडील लुकाराम, पत्नी पुष्पा, मुलगा रोहन, मुलगी शिवानी असा परिवार आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT