सोलापूर : स्वेच्छानिवृत्तीच्या पैशासाठी हवालदाराची आत्महत्या

स्वेच्छानिवृत्तीच्या पैशासाठी हवालदाराची आत्महत्या
स्वेच्छानिवृत्तीच्या पैशासाठी हवालदाराची आत्महत्या
Published on
Updated on

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा गेल्या 6 महिन्यांत त्यांना निवृत्तीचे पैसे मिळत नसल्याने आर्थिक कोंडीतून सोलापुरात निवृत्त हवालदार कल्याण दगडू गवसाने (वय 50, रा. माशाळवस्ती, सोलापूर) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी (दि. 9) रोजी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. गवसाने यांनी आजारानिमित्त स्वेच्छा निवृत्ती घेतली होती; पण निवृत्तीनंतर रक्कम न मिळल्याच्या नैराश्यातून आपण आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी आढळून आली.

पोलिस कॉन्स्टेबल कल्याण गवसाने हे मूळचे सोलापूरचे रहिवासी आहेत. त्यांची बदली प्रथम उस्मानाबाद व त्यानंतर नाशिक कारागृहात झाली होती. नाशिक कारागृहात काम करीत असताना त्यांना हवालदार पदावर बढती मिळाली; पण ते कॅन्सरच्या आजाराने ग्रस्त होते. ते सोलापुरात आले होते. त्यांनी आजारपणामुळे आता नोकरी करता येणार नाही, असे पत्नी व मुलांना सांगितले. त्यानुसार त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. निवृत्तीनंतर मिळालेल्या पैशातून मुलांचे शिक्षण व उर्वरित आयुष्य जगता येईल, असे त्यांचे म्हणणे होते. त्यानुसार ते सोलापुरात माशाळ वस्ती येथे राहण्यास आले. पण सहा महिने उलटूनही त्यांना पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांनी 9 जून रोजी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास राहते घरी घरातील बेडरूमच्या लोखंडी हूकास बेडसीटच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांना खाली उतरून उपचारासाठी सिव्हिलमध्ये उपचारासाठी नेले, परंतु त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. याची याची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.

आत्महत्येचा चिठ्ठीत खुलासा

आत्महत्येपूर्वी गवसाने यांनी चिठ्ठी लिहिली होती. यात म्हटले आहे, नाशिक कारागृहातील महिला लिपीक आहेर यांनी स्वेच्छा निवृत्तीच्या कामासाठी कारागृहात पैसे द्यावे लागतात असे सांगून 3 हजाराची मागणी केली. तेव्हा मी माझ्या मुलाने आहेर यांना 2 हजार रूपये पाठविले. तरीही त्यांना त्यांचे पैसे मिळाले नाहीत. याबाबत निवृत्तीचे पैसे मिळत नाही म्हटल्यावर मी नाशिक कारागृहातील वरिष्ठ अधिकार्‍यांशी पत्रव्यवहार करून आपली व्यथा सांगितली. त्यानंतर नाशिक कारागृहाचे जेलर गायकवाड यांनी 'आधी तुम्ही माफी मागा व मी दारूच्या नशेत वरिष्ठांना पत्र लिहीले आहे असे लिहून द्या. तो पर्यंत तुमचे निवृत्तीचे पैसे मिळणार नाहीत' अशी धमकी दिली. त्यामुळेच मला आर्थिक कोंडीतून आत्महत्या करावी लागत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news