जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जळगाव, सावदा येथील हॉटेल मनाली परमीटरूम आणि बिअर बारमध्ये रात्री चोरट्यांनी डल्ला मारला. चोरट्यांनी दारू व बियरचे बॉक्सेस आणि बाटल्या चोरून नेल्याची घटना आज उघडकीस आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सावदा येथे महामार्गाला लागून हॉटेल मनाली परमीटरूम आणि बीअरबार आहे. या हॉटेलच्या उत्तरेच्या बाजूस असणार्या खिडकी तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला.
अधिक वाचा
यानंतर येथील हॉटेलमध्ये असणारे दारू आणि बियरचे बॉक्सेस आणि बाटल्या चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. ही घटना आज शनिवारी (दि.३१) रोजी पहाटे उघडकीस आल्याने खळबळ उडाली.
अधिक वाचा
याची माहिती मिळताच सावदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याबाबत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
अधिक वाचा
या दरम्यान, चोरट्यांनी लाख रूपयांची दारू व बियर चोरून नेल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
हेही वाचलंत का?
पाहा : फुकट बिर्याणी मागविणाऱ्या महिला डीसीपीच्या ऑडिओ क्लीपची होणार चौकशी