ट्रेनी आयपीएस अधिकाऱ्यांशी पंतप्रधान मोदींनी साधला संवाद | पुढारी

ट्रेनी आयपीएस अधिकाऱ्यांशी पंतप्रधान मोदींनी साधला संवाद

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: ट्रेनी आयपीएस अधिकाऱ्यांशी आज पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी संवाद साधला. पोलिस सेवेत काम करीत असताना ‘राष्ट्र प्रथम, सदैव प्रथम’ ची भावना प्रतिबिंबित व्हावी, अशी अपेक्षा त्यां‍नी यावेळी व्‍यक्‍त केली.  सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पुलिस अकादमीत प्रशिक्षण घेतलेल्या ट्रेनी आयपीएस अधिकाऱ्यांना मोदी यांनी  पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.

राष्ट्रीय पुलिस अकादमीने गेल्या ७५ वर्षात उत्तम पोलीस सेवेचा प्रयत्न केला आहे. पोलीस प्रशिक्षणाशी अनुषंगिक पायाभूत सुविधांचा अलिकडील काळात वेगाने विकास झाला आहे, असेही त्‍यांनी सांगितले.

आपल्यासारख्या युवकांबराेबर  चर्चा करण्याची, आपले विचार जाणण्याची माझी इच्छा असते. आपले विचार, प्रश्न, उत्सुकता माझ्यासाठी भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सहाय्यक ठरतील, अशी अपेक्षाही त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

आपण एक भारत, श्रेष्ठ भारताचे ध्वजवाहक आहात. आपल्या प्रत्येक कृतीमधून ‘राष्ट्र प्रथम, सदैव प्रथम’ ची भावना प्रतिबिंबित झाली पाहिजे, असेही ते म्‍हणाले.

आपल्या सेवा देशाच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात असतील, शहरात असतील.

फील्डवर असताना आपण जे काही निर्णय घ्याल, ते देशहितासाठी, राष्ट्रीय परिपेक्ष्यासाठी असले पाहिजेत, असेही पंतप्रधान नरेंद्र माेदी म्‍हणाले.

हेही वाचलं का? 

पाहा व्‍हिडीओ : पुराने ओढवलेल्या भयाण परिस्थितीतून जातंय महाड

Back to top button