जळगांव; पुढारी वृत्तसेवा : जळगाव जिल्हा बँक : खडसे परिवाराच्या मागील ईडीचे चक्र थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने घोडसगाव येथील साखर कारखान्याला दिलेल्या कर्जाची माहिती जिल्हा बँकेकडून नोटीस बजावून मागितली आहे.
सदरची नोटीस ही दोन ते तीन दिवसांपूर्वी बजावली होती अशी माहिती खात्रीशीर सूत्रांकडून मिळाली असून या माहितीला बँकेचे एमडी यांनी दुजोरा दिला आहे
खडसे परिवारामागे पुण्यातील भोसरी एमआयडीसी भूखंड खरेदी गैरव्यवहार प्रकरणी ईडी चौकशी सुरू आहे. यात एकनाथ खडसे यांचे जवाई शिरीष चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. असे असतानाच ईडीने जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेला नोटीस बजावली आहे.
ईडीने जळगाव जिल्हा बँकेकडून मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव येथे असलेल्या खडसेंच्या श्री संत मुक्ताई साखर कारखान्याला दिलेल्या कर्जाची माहिती मागितली आहे. जिल्हा बँकेने कर्जाची सविस्तर माहिती ईडीला सादर केल्याचेही सांगितले जात आहे.
ईडीने ही नोटीस जिल्हा बँकेला तीन ते चार दिवसांपूर्वीच बजावल्याची माहिती सूत्रांची माहिती आहे.
या नोटिशीच्या अनुषंगाने जिल्हा बँकेने श्री संत मुक्ताई साखर कारखान्याला दिलेल्या कर्जाच्या संदर्भातील सविस्तर माहिती ईडीला सादर केल्याचे समजते.
याबाबतची माहिती बुधवारी सायंकाळी माध्यमांसमोर आली.
जिल्हा बँके प्रशासनाकडून बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र देशमुख यांनी या माहितीला दुजोरा दिला.
या प्रकरणासंदर्भात जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र देशमुख यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, बँकेला ईडीने एक पत्र देऊन घोडसगावच्या श्री संत मुक्ताई सहकारी साखर कारखान्याला दिलेल्या कर्जाची माहिती मागितली होती. त्यात साखर कारखान्याला किती कर्ज दिले आहे, त्यातील किती कर्जाची परतफेड झाली आहे, कर्जाचे हफ्ते नियमित भरले जात आहेत का? अशा स्वरूपाची माहिती विचारली आहे. ती माहिती बॅंकेकडून दिली जाईल. अशा स्वरूपाची माहिती सरकारी यंत्रणांकडून मागितली जाणे ही नियमित रुटीन प्रोसेस असते. जिल्हा बँकेने श्री संत मुक्ताई साखर कारखान्याला 30 कोटी रुपयांचे कर्ज दिले असून, त्याची नियमित परतफेड सुरू असल्याचेही देशमुख यांनी यावेळी सांगितले.
रोहिणी खेवलकर (खडसे) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा व घोडसगाव येथील श्री संत मुक्ताई सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा आहेत.
रोहिणी खेवलकर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या आहेत.
जिल्हा बँकेने साखर कारखान्याला दिलेले कर्ज नियमानुसार आहे की नाही? याची चौकशी शक्यता वर्तवली जात आहे.
यामुळे रोहिणी खेवलकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचलं का?
https://youtu.be/121lAOPYj3M