उत्तर महाराष्ट्र

जळगाव : गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवणाऱ्यास अटक

गणेश सोनवणे

जळगाव : गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवणाऱ्या संशयिताला स्थानिक गुन्हे शाखाने पिस्तूलसह ताब्यात घेतले आहे. या प्रकणी रामानंद पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना जळगाव शहरातील खंडेराव नगर भागात एक संशयित गावठी पिस्तूल बाळगून दहशत करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोहेकॉ सुधाकर अंभारे, पोहेकॉ महेश महाजन, पोना विजय पाटील, पोना प्रितम पाटील, पोकॉ. सचिन महाजन, पोकॉ. पंकज शिंदे यांना रवाना केले. दरम्यान, खंडेराव नगर भागात अश्विन विजय हिरे (वय २०) हा गावठी पिस्तुल बाळगत दहशत निर्माण करीत असल्याचे आढळून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडील १ गावठी बनावटीची पिस्तुलसह ३० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्या विरुध्द रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT