उत्तर महाराष्ट्र

नाशिक : सातपूर, पश्चिममधील या ठिकाणचा पाणीपुरवठा उद्या राहणार खंडित

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सातपूर पाणीपुरवठा विभागातील ध—ुवनगर, बळवंतनगर, गणेशनगर, रामराज्य, नहुष येथील जलकुंभ भरणार्‍या थेट जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने सातपूर तसेच पश्चिम विभागातील प्रभाग क्र. 7, 8, 9 आणि 12 मधील पाणीपुरवठा गुरुवारी (दि.7) खंडित ठेवण्यात येणार आहे.

कार्बन नाका, मेघा इंडस्ट्रिजलगत 500 मी.मी. व्यासाची पीएससी आणि ध—ुवनगर डीपी रोडलगत मोतीवाला कॉलेज येथील 500 मी.मी. व्यासाच्या सिमेंट जलवाहिनीला गळती सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे. त्यामुळे या ठिकाणी दि. 7 एप्रिल रोजी जलवाहिनी गळती दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने सातपूर विभागातील गुरुवारी (दि.7) सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. तसेच दि.8 रोजीचा सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल, असे मनपाने कळविले आहे.

सातपूर विभागातील प्रभाग क्र. 7 (भागश:) मधील नहुष सोसायटी परिसर, पूर्णवादनगर, दादोजी कोंडदेवनगर, अरिहंत नर्सिंग होम परिसर, आकाशवाणी टॉवर परिसर, तिरुपती हाऊस परिसर, सहदेवनगर, सुयोजित गार्डन परिसर, अयाचितनगर, गीतांजली सोसायटी, पंपिंग स्टेशन, शांतिनिकेतन या परिसरात तसेच प्रभाग क्र. 8 मधील बळवंतनगर, रामेश्वरनगर, सिरीन मिडोज, सोमेश्वर कॉलनी, आनंदनगर, खांदवेनगर, सदगुरूनगर, पाटील लॉन्स परिसर, आनंदवली, आनंदवली गाव व परिसर, सावरकरनगर, शंकरनगर, कल्याणीनगर, नरसिंहनगर, पंचम सोसायटी, रामनगर, दातेनगर, अयोध्या कॉलनी, भगूरकर मळा परिसर, गणेशनगर, कामगारनगर, गुलमोहर कॉलनी, पाइपलाइन रोड परिसर, गुरुजी हॉस्पिटल मागील परिसर विवेकानंदनगर, निर्मला विहार, प्रभाग क्र. 9 (भागश:) मधील मोतीवाला कॉलेज परिसर, गुलमोहर कॉलनी परिसर, शिवशक्ती कॉलनी, तुकाराम क्रीडांगण परिसर, नवीन ध—ुवनगर परिसराला पाणीपुरवठा होणार नाही. तसेच प्रभाग क्र. 12 (भागश:) रामराज्य जलकुंभ वितरण क्षेत्रातील कल्पनानगर, मॉडेल कॉलनी, कृषिनगर परिसर, उदय कॉलनी, नेर्लिकर हॉस्पिटल, गंगापूर रोड स्वामी समर्थ मंदिर परिसर, डिसूझा कॉलनी, गंगापूर रोड परिसराचाही पाणीपुरवठा खंडित राहणार आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT